ठाणे: स्वत:चे पैसे मागितले म्हणून 2 सहकाऱ्याकडून मालकाची निघृण हत्या; आरोपींना अटक
Murder | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

स्वत:चे पैसे मगितल्यामुळे आपल्या मालकाचा खून (Murder)  केल्याप्रकरणी पोलिसांनी २ आरोपींना अटक केली आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्री ठाणे (Thane) परिसरात घडली. आरोपी हे मृत मालकाच्या येथे काम करीत होते. दरम्यान, आरोपीने मालकाकडून काही पैसे घेतले होते. कामगार आपले पैसे देत नसल्यामुळे मालकाने त्याच्याकडे पैशांची मागणी करायला सुरुवात केली. एवढेच नव्हे तर, थकबाकी न मिळाल्यामुळे मालकाने आरोपीच्या मालकीचे स्पीकर्स घेऊन घरी गेले. यामुळे आरोपी अधिकच चिडला. त्यानंतर आरोपीने आपल्या सहकामगारासह मालकाच्या हत्येचा सापळा रचला. तसेच मालक झोपेत असताना त्याच्या डोक्यात प्रहार करुन त्याची निघृण हत्या केली.

अविनाश बामणे आणि रणजित शैरे असे या आरोपींचे नाव आहेत. हे दोघेही एकाच ठिकाणी कामाला होते. त्यावेळी अविनाश याने हरिशचंद्र कचोरीया याच्याकडून काही रक्कम घेतली होती. त्यानंतर अविनाश यांनी कचोरीयाच्या येथील काम सोडले. यामुळे अविनाश यांनी थकबाकी न दिल्यामुळे कचोरीया येता-जाता अविनाशकडे पैशांची मागणी करत असे. दरम्यान, अविनाश आपले पैसे देत नसल्यामुळे कचोरीयाने सोमवारी त्याच्या मालकीचे स्पीकर घेऊन गेला. ज्यामुळे अविनाशचा पारा अधिकच चढला. त्यानंतर अविनाश याने रणजितला भेटून कचोरीयाची हत्या करण्याचे ठरविले. त्यानुसार अविनाश आणि रणजित शैरे यांनी मंगळवारी मध्यरात्री कचोरीयाच्या डोक्यात प्रहार करत त्याची निघृण हत्या केली. हे देखील वाचा- मुंबई: एकतर्फी प्रेमातून 14 वर्षीय तरुणीची लैंगिक अत्याचारानंतर हत्या; आरोपीस अटक

याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. या घटनेमुळे आजुबाजूच्या परिसरात खळबळजनक वातावरण निर्माण झाले आहे.