मुंबई: एकतर्फी प्रेमातून 14 वर्षीय तरुणीची लैंगिक अत्याचारानंतर हत्या; आरोपीस अटक
प्रतिकात्मक फोटो | Image only representative purpose (Photo credit: File)

एकतर्फी प्रेमातून 14 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना पालघर (Palghar) जिल्ह्यातील तलासरीमध्ये (Talasari) घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपी आणि हत्या झालेली तरुणी एकाच परिसरातील रहायला होते. आरोपीचे संबधित तरुणीवर एकतर्फी प्रेम होते. यासाठी आरोपीने तरुणीकडे याबद्दल विचारणा केली होती. पंरतु, तरुणीने नकार दिल्यानंतर आरोपीने आपल्याकडील काचेची बॉटल तिच्या डोक्यात मारली. त्यानंतर तिचा गळा दाबून हत्या केली. यामुळे घटनेमुळे पालकवर्गांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अजय असे या आरोपीचे नाव असून तो कांदिवलीत परिसरात एकटाच राहत होता. महत्वाचे म्हणजे अजय मुळचा उत्तर प्रदेशमधील आहे. अजय हा गेल्या काहीमहिन्याआधी नोकरीसाठी मुंबईत आला होता. मुंबईत आल्यानंतर अजयने बुट धुण्याचा छोटा व्यवसाय सुरु केला. दरम्यान, अजय ज्या ठिकाणी राहत होता, तेथील एका तरुणीवरसोबत त्याला एकतर्फी प्रेम झाले. त्याने तिच्याकडे याबद्दल विचारणा केली होती. संबधित मुलीने त्याला नकार दिल्यानंतर अजयने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने आपल्याकडील काचेची बाटली संबधित मुलीच्या डोक्यावर मारली. यावर न थांबता अजने शेवटी गळा दाबून तिची हत्या केली. हे देखील वाचा- अमरावती: एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयीन तरुणीची हत्या; जमावाकडून आरोपीस चोप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणीच्या वडिलांनी 2 ऑक्टोबर रोजी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. त्यानुसार स्थानिक पोलिसांनी बेपत्ता मुलीचा शोध घ्यायला सुरुवात केली. सर्वप्रथम पोलिसांनी पीडित मुलीच्या पालकांकडून तिचा फोननंबर घेऊन त्यानंबर आलेल्या कॉल्सची माहिती मिळवली. यामुळे पोलिसांना आरोपीला अटक करण्यास सोपे झाले.