Image only representative purpose (Photo credit: File)

एकतर्फी प्रेमातून (One Sided Love) महाविद्यालयीन तरुणीची हत्या केल्याची खळबळजनक घटना अमरावती (Amravati) शहरात घडली आहे. तुषार मस्करे (वय 20) असे आरोपीचे नाव आहे. त्याने अर्पिता ठाकरे (18) नावाच्या महाविद्यालयीन तरुणीची हत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारी ही घटना राजापेठ पोलीस ठाण्याअंतर्गत येणा-या मुधोळकर पेठ येथे घडली. या घटनेत अर्पिता ठाकरे हिच्यासोबत असलेली तरुणीही जखमी झाली. घटनास्थळावरु पळ काढत असताना घटनास्थळावरील नागरिकांनी आरोपीला पकडून चोप दिला.

प्राप्त माहितीनुसार, भातकुली तालुक्यात असलेल्या मलकापूर येथील रहिवासी अर्पिता ठाकरे ही तरुणी अमरावती येथील भारतीय महाविद्यालयात शिक्षण घेत होती. मुधोळकरपेठ येथे ती शिकवणीसाठी जात होती. दरम्यान, अर्पितावर पाळत ठेऊन असलेल्या तुषार मस्करे या तरुणाने अर्पिता ही शिकवणीवर्गाच्या बहेर येताच तिच्यावर चाकुचे वार सपासप केले.

चाकुने एकापाठोपाठ केलेले 18 वार वर्मी लागल्याने अर्पिताचा जागीच मृत्यू झाला. परिसरातील नागरिकांनी जखमी अवस्थेत असलेल्या अर्पिता हिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला उपचारापूर्वीच मृत घोषीत केले. आरोपी तुषार मस्करे हा कवठा बहाळे येथील रहिवासी असल्याचे समजते. (हेही वाचा, एकतर्फी प्रेमातून महिलेवर चाकू हल्ला)

अमरावती शहरात एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या घडली असतानाच आणखी एका तरुणाची हत्या घडल्याचे समोर आले आहे. ही घटना गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणा-या रंगोली लॉनजवळ मंगळवारी रात्री घडली. राजेंद्र गोसावी असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. अवघ्या 24 तासात शहरात इतक्या क्रूरपणे दोन हत्या झाल्यानेर परिसरात घबराटीचे वातावरण आहे.

दरम्यान, अर्पिता हिच्या मारेकरी तरुण तुषार याला पोलिसांनी नमुना परिसरातुन अटक केली आहे. तर, गाडगेनगर परिसरातील हत्या प्रकरणातील आरोपीचा शोध सीसीटीव्ही फुटेजवरुन सुरु आहे, असे पोलिसंनी म्हटले आहे. दोन्ही प्रकरणाचा पोलीस तपास सुरु आहे.