फोटो सौजन्य - PTI
ठाणे येथील खोपट परिसरातील ठाणे महापालिकेच्या मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्था आणि वैद्यकीय विद्यार्थिनी वसतिगृहातील महिला सुरक्षारक्षकावर धारदार चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

जखमी महिलेला उपचारासाठी ठाणे सिव्हिल रुग्णालयात दाखल केले असून तिची परिस्थिती अतिशय गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. तर उपस्थित नागरिकांनी आरोपीला पकडुन पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.