Ghatkopar News: गेल्या काही दिवसांपासून एक फोटो व्हायरल होत होते. यावर सोशल मीडियावर युजर्स यावर चर्चा करताना दिसले. ठाणे शहारातील मुंलुड परिसरात एका मराठी महिलेला गाळा नाकरल्यावरून वाद चर्चेत असताना, घाटकोपर येथील एका उद्यानाबाहेरील गुजराती पाटी शिवसैनिकांनी तोडला. शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी मारु घाटकोपर असं गुजरातीत लिहलेली पाटी फोडली. त्यामुळे आता मुंबईत मराठी आणि गुजराती असा नवा वाद सुरु होणार असल्याची शक्यता आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांकडून शिवसैनिकांवर कारवाई होण्याची शक्यता दर्शवली आहे.
मारु घाटकोपर लिहलेली पाटी असा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवसैनिकांनी पाटी तोडली. ठाकरे गटाकडून पाटी फोडल्यानंतर आणि पाटी फोडल्याच्या आधीचा फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. मनसेनी पाटी फोडल्यानंतर जय महाराष्ट्राचा बोर्ड लावला आहे. तसेच, त्या फोटोवर मुंबईचा मराणीबाणा पुसण्याचा प्रयत्न शिवसैनिकांनी हाणून पाडला, असा आशाय लिहिण्यात आला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून मुंबईत मराठी आणि अमराठी लोकांचा वाद पाहायला मिळत आहे. याच मुंबईत इतर भाषेतील पाट्या काढून टाकाव्यात असा इशारामनसैनिकांकडून देण्यात आला. घाटकोपरमधील गुजराती बोर्ड तातडीने हटवण्याची मागणी शिवसेना आणि मनसेकडून करण्यात आली होती. मनसेकडून मुंबई महापालिकेला यासाठी अल्टिमेटमही देण्यात आला होता.