Samruddhi Mahamarg, Accident (PC - ANI/File Photo)

Samruddhi Mahamarg Accident: समृध्दी महामार्गावर अपघाताची मालिका सुरुच आहे. गेल्या काही दिवसांपासून अपघाताच्या घटनेत वाढल्या आहेत. काल रात्री अकराच्या सुमारास समृध्दी महामार्गावर हा अपघात घडला. दोन कार एकमेकांना धडकल्याने ही घडना घडली. हा अपघात इतका भीषण होता की, यात सात जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात आणखी 4 जण जखमी झाले. हा अपघात जालना जिल्ह्यातील कडवंची गावाजवळ झाला. (हेही वाचा-  पुण्यात टॅंकर चं स्टेअरिंग 14 वर्षीय मुलाच्या हातात; दुचाकीला धडक, 4 जण जखमी

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, नागपूरकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अर्टिगा कारला विरुध्द दिशेने येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने धडक दिली. या धडकेत भीषण अपघात झाला. अर्टिगा कार क्रमांक HH 47, BP 5478 ही मुंबईच्या दिशेने जात होती. स्विफ्ट डिझायर ही कार डिझेल भरून विरुध्द दिशेने येत असताना दोन्ही कारची एकमेकांना धडक लागली. ही धडक इतक्या जोरात होती की, दोन्ही कार बॅरिकेड मोडून थेट खाली पडली.

या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला तर सहा ते सात जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच, पोलिस आणि बचावकार्य सुरु घटनास्थळी पोहचले. जखमींना अपघातग्रस्त कारमधून बाहेर काढले. हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही कार याच चक्काचूर झाले. अपघातामुळे रात्री वाहतुक कोंडी झाली होती.