Pune Tanker Accident: पुण्यात टॅंकर चं स्टेअरिंग 14 वर्षीय मुलाच्या हातात; दुचाकीला धडक, 4 जण जखमी
Accident PC PIXABAY

पुणे शहर पोर्शे कारच्या अपघातानंतर पुन्हा एकदा हादरलं आहे. वानवडी  (Vadavani Accident) भागामध्ये टॅंकर चं स्टेअरिंग 14 वर्षाच्या मुलाच्या हातात असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याने दिलेल्या धडकेत अनेक जण जखमी झाले आहेत. सकाळी व्यायामासाठी बाहेर पडलेल्या मुलांना आणि एका दुचाकीवरून जाणार्‍या महिलेला या अल्पवयीन चालकाने धडक दिली आहे. हा अपघात सकाळी साडे सहा च्या सुमारास घडला आहे.

वानवडी भागात झालेल्या अपघातानंतर स्थानिकांनी टॅंकर अडवून धरला आणि चालकाला पकडलं होतं. भरधाव टॅंकरने दिलेल्या धडकेनंतर लोकांनी धावाधाव केली. अल्पवयीन मुलगा टॅंकर चालवत असल्याचं पाहून त्यांनी त्याला धरून ठेवला. दुचाकीवरून कुस्ती प्रशिक्षक संतोष ढुमे आणि त्यांची पत्नी जात होती. त्यांच्या तालमीत शिकणाऱ्या मुली व्यायामासाठी रस्त्यावरून धावत होत्या. टँकरची दुचाकीला धडक बसताच त्यांची पत्नी दुचाकीवरून उडून थेट समोर रस्त्यावर पडली. तर, टँकरखाली दोन मुली आल्या. ढुमे यांनी या मुलींना बाहेर काढलं. या अपघातात मुलीही जखमी झाल्या आहेत. Uttar Pradesh Car Crushes Toddler: धक्कादायक! आईच्या डोळ्यासमोरचं चिमुकलीला कारने चिरडले, घटना CCTV कैद. 

पुण्यात पोर्शे कारचं प्रकरणं ताजं असताना आता घडलेला हा अपघात संताप वाढवणारं आहे. अवजड टँकर अवघ्या 14 वर्षांच्या मुलाच्या ताब्यात पाहून पोलिस घटनास्थळी दाखल होई पर्यंत नागरिकांनी त्याला पकडलं होतं. सध्या जखमींना उपचारासाठी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं आहे.