Suicide Representational Image (Photo Credits: ANI)

Nagpur Shocker: रविवारी देशभरात नेशनल एलिजिबिलिटी कम एंट्रेंस टेस्ट (National Eligibility cum Entrance Test- NEET) परीक्षा घेण्यात आली. मात्र, नीट परीक्षा देण्याच्या काही तास आधी नागपूरातील (Nagpur) तरुणीने आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. निलिमा शाहू असं या मृत तरुणीचं नाव आहे. नीट परीक्षा देण्याच्या काही तास आधी, शनिवारी मध्यरात्री बुटीबोरी येथील उड्डाणपुलावरून निलिमाने 50 फुटांवरून उडी मारली. रविवारी पहाटे फ्लायओव्हरच्या खाली डोक्यावर गंभीर जखमा असलेला तिचा मृतदेह पोलिसांना सापडला. नीट-यूजी क्रॅक करण्याचा हा तिचा दुसरा प्रयत्न होता.

प्राप्त माहितीनुसार, निलिमाने कुटुंबासह रात्रीचे जेवण केले आणि नंतर ती तिच्या खोलीत गेली. तिच्या बुटीबोरीतील म्हाडा कॉलनीतील घरातून पहाटे 1 च्या सुमारास ती बाहेर पडली. निलिमा 1.30 च्या सुमारास फ्लायओव्हरवर पोहोचण्यासाठी जवळपास एक किलोमीटर चालत गेली. पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये नीलिमा मध्यरात्री 1 वाजता उड्डाणपुलाकडे पायी जात असल्याचे दिसून आले. तिची चप्पल उड्डाणपुलावर सापडली. (वाचा - NEET-UG 2024 Paper Leaked? : नीट परीक्षेचा पेपर फूटल्याच्या वृत्ताचा National Testing Agency कडून इन्कार; पहा खुलासा)

दरम्यान, रविवारी पहाटे 5 च्या सुमारास निलिमा घरातून बेपत्ता असल्याचे समजल्यानंतर कुटुंबियांनी तिच्या मित्र आणि ओळखीच्या लोकांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली. दरम्यान, कोणीतरी बुटीबोरी पोलिसांना कळवले की निलिमाचे कुटुंबीय तिला शोधत आहेत. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने निलिमाचा मृतदेह ज्या ठिकाणी पडला होता त्या ठिकाणी तिच्या कुटुंबीयांना बोलावले आणि त्यांना तिची ओळख पटू शकते का, असे विचारले.

बुटीबोरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक हृदयनारायण यादव यांनी सांगितले की, निलिमा कदाचित परीक्षेच्या तणावाखाली होती. निलिमाने बोर्डाच्या परीक्षेत चांगले गुण मिळवले होते आणि ती अभ्यासू होती. गेल्या वर्षी तिच्या अयशस्वी प्रयत्नाच्या पार्श्वभूमीवर तिच्यावर कामगिरीचा एक प्रकारचा दबाव असावा. (वाचा -Madhya Pradesh Suicide: बारावीचा निकाल लागल्यानंतर दोघांची आत्महत्या, मध्य प्रदेशातील घटना)

निलिमाने हे टोकाचे पाऊल उचलण्यामागे तिच्या कुटुंबीयांनी परीक्षेचा ताण हे स्पष्टपणे कारण दिले नसले तरी आम्ही ते नाकारू शकत नाही, असं यादव यांनी म्हटलं आहे. यादव यांनी सांगितले की, निलिमा तिचा मोबाईल घरीच सोडून गेली होती. पोलिसांना या प्रकरणात कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही.