मेडिकल एंटरन्स परीक्षा NEET-UG परीक्षा 5 मे दिवशी झाली. या परीक्षेचा पेपर लीक झाल्याचं वृत्त सध्या वायरल होत आहे. मात्र एनटीए कडून परीक्षेचा पेपर लीक झाल्याचं वृत्त फेटाळण्यात आले आहे. National Testing Agency कडून यावर खुलासा करताना प्रत्येक प्रश्नपत्रिका मौल्यवान असल्याचं म्हटलं आहे. एनटीएने म्हटले आहे की सोशल मीडियावर फिरत असलेल्या प्रश्नपत्रिकेच्या कथित फोटोंचा वास्तविक पेपरशी कोणताही संबंध नाही.
"NTA च्या सुरक्षा प्रोटोकॉल आणि Standard Operating Procedures वरून हे सिद्ध झाले आहे की कोणत्याही पेपर लीकचा दावा करणाऱ्या सोशल मीडिया पोस्ट पूर्णपणे निराधार आहेत. Senior Director, NTA Sadhana Parashar,यांनी प्रतिक्रिया देताना प्रत्येक प्रश्नपत्रिका मौल्यवान असल्याचं म्हटलं आहे. एकदा परीक्षा सुरू झाली की कोणतीही बाहेरील व्यक्ती किंवा संस्था आत येऊ शकत नसल्याचं त्या सांगतात.
NTA ची पोस्ट
Regarding NEET (UG)-2024: Posts circulating on Social Media pic.twitter.com/OqzwA7rVpF
— National Testing Agency (@NTA_Exams) May 6, 2024
परीक्षा केंद्रांचा गेट बंद झाल्यानंतर कोणालाच आत येण्यास परवानगी नाही. सार्या परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे असतात. त्यामुळे सध्या सोशल मीडीयात वायरल होत असलेला प्रश्नपत्रिकेचा फोटो आणि वास्तवातील प्रश्नपत्रिका यांचा एकमेकांशी संबंध असू शकत नाही. 5 मे दिवशी देशात 4750 केंद्रांवर परीक्षा घेण्यासाठी 571 शहरातील परीक्षा केंद्र सुसज्ज होती त्यामध्ये परदेशातीलही 14 शहरांचा समावेश होता.
एनटीए च्या दाव्यानुसार, रविवारी (5 मे) राजस्थानमधील एका परीक्षा केंद्रावर चुकीच्या प्रश्नपत्रिकांचे वितरण केल्यामुळे काही उमेदवारांनी पेपर सोडले. एजन्सीने प्रश्नपत्रिका फुटल्याचा इन्कार केला होता. "परीक्षा प्रक्रियेच्या अखंडतेशी तडजोड केली गेली नाही. नंतर केंद्रावर 120 प्रभावित उमेदवारांसाठी परीक्षा पुन्हा घेण्यात आली," असे पराशर यांनी रविवारी सांगितले होते.