Coronavirus: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या 'मातोश्री' (Matoshree) निवासस्थानाजवळील चहा विक्रेत्याची (Tea Vendor) कोरोना चाचणी पॉझिटिव्ह (Coronavirus Test) आली आहे. मातोश्री परिसरात कोरोना रुग्ण आढल्याने एकच खळबळ उडाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून उद्धव ठाकरे यांचे अंगरक्षक आणि कार्यलयीन कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. यासंदर्भात पीटीआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.
मातोश्री निवासस्थान वांद्रे पूर्व येथील कलानगरात मुख्य प्रवेशद्वारापासून जवळच ही चहाची टपरी आहे. या चहावाल्याला करोनाची लागण झाल्याचं मुंबई महापालिकेने सांगितलं आहे. मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज मुंबईत 57 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोना बाधितांची संख्या 490 वर पोहचली आहे. तसेच आज मुंबईत एकूण 4 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून 5 जणांना आज डिस्चार्ड देण्यात आला आहे. आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे. राज्यात मुंबईत सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. (हेही वाचा - Coronavirus: मुंबईत 490 जण कोरोनाग्रस्त; शहरात आज 57 नवीन कोरोना रुग्णांची भर)
Tea vendor near Maharashtra CM's private residence tests positive to coronavirus: BMC
— Press Trust of India (@PTI_News) April 6, 2020
दरम्यान, गेल्या 24 तासांत भारतात 704 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 4281 वर पोहचली आहे. यातील 3851 जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच 318 जणांना उपचार देऊन डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आतापर्यंत देशात 111 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय गेल्या 24 तासांत 28 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यासंदर्भात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने माहिती दिली आहे.