केंद्र सरकारच्या कार्मिक मंत्रालयाकडून (Personnel Ministry) देशभरातील राज्यांचा सुशासन सूचकांक ( Good Governance Index) जाहीर केला आहे. या सूचकांकानुसार तामिळनाडू नागरिकांना राज्याने सुशासन देण्या प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर तामिळनाडू (Tamil Nadu) खालोखाल महाराष्ट्र (Maharashtra) दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर महाराष्ट्राचा शेजारी असलेल्या कर्नाटक (Karnataka) राज्याने सुशासनाच्या बाबतीत तिसरा क्रमांक पटकावला आहे. पहिल्या तिन नंतर छत्तीसगढ, आंध्र प्रदेश, गुजरात, हरियाणा आणि केरळ अनुक्रमे चार, पाच, सहा, सात आणि आठव्या क्रमांकावर आहेत.
दरम्यान, केंद्र सरकारच्या कार्मिक मंत्रालयाकच्या सुशासन सूचकांकामध्ये मध्य प्रदेश नवव्या, पश्चिम बंगाल दहाव्या, तेलंगणा 11 व्या क्रमांकावर आहे. तर, राजस्थान, पंजाब, उडीसा, बिहार, गोवा, उत्तर प्रदेश आणि झारखंड अनुक्रमे बारा, तेरा, चौदा, पंधरा, सोळा, सतरा आणि आठराव्या क्रमांकावर आहेत. (हेही वाचा, CMIE अहवाल: भारतात रिकाम्या हातांची संख्या वाढली, 2016 नंतर देशात बेरोजगारीचे प्रमाण सर्वाधिक)
उत्तर पूर्व आणि पर्वतीय (डोंगराळ) वर्गवारीत हिमाचल प्रदेश सर्वात वरच्या स्थानावर आहे. तर हिमाचल प्रदेशाखालोखाल, उत्तराखंड, त्रिपुरा, मिजोरम, सिक्किम, असम, जम्मू आणि कश्मीर यांचा समावेश होतो. केंद्र शासीत प्रदेशांमध्ये पॉन्डेचरी पहिल्या क्रमांकावर आहे. तर, त्याखालोखाल चंडीगढ, दिल्ली, दमन आणि दीव, अंदमान आणि निकोबार बेटांचा समूह तसेच दादरा आणि नगर हवेली अशी क्रमावरी लागते.