
पुण्यामध्ये स्वारगेट बस डेपोत (Swargate Bus Depot) काही दिवसांपूर्वी 26 वर्षीय तरूणीवरील अत्याचार झाला होता. या घटनेने महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली असताना आता आरोपी दत्ता गाडे याच्या वकिलावर जीवघेणा हल्ला झाला आहे. दत्ता गाडेचे वकील साहिल डोंगरे (Sahil Dongre) यांच्यावर हल्ला झाला आहे. ही घटना सोमवार 17 मार्चच्या सकाळची आहे. हडपसर (Hadapsar) येथून डोंगरे यांचे अपहरण करयात आले. त्यांना बोपदेव घाटात नेण्यात आले. मारहाण करून त्यांना दिवे घाटात सोडण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
वकील साहिल डोंगरे यांना जखमी अवस्थेमध्ये हडपसर येथील पोलिस ठाण्यात जाऊन घडल्या प्रकाराबद्दल तक्रार नोंदवली आहे. या हल्ल्यामागील कारण अजूनही अस्पष्ट आहे.
स्वारगेट बस डेपो अत्याचार प्रकरण
स्वारगेट बस डेपो मध्ये 26 वर्षीय तरुणीवर डेपोमध्येच असलेल्या 'शिवशाही' बसमध्ये बसवण्यात आले. आरोपीने स्वत: कंडक्टर असल्याचं भासवून पीडित महिलेचा विश्वास मिळवला आणि तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणानंतर आरोपी दत्ता गाडे ला 28 फेब्रुवारीला अटक करण्यात आली आहे. आरोपी दत्ता गाडेला सध्या 26 मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.