Sharad Pawar | (Photo Credits-Twitter)

बीड (Beed) येथील चारा छावणी बंद करणय्याच्या निर्णया तुर्तास स्थगिती देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सोबत या मुद्द्यावर चर्चा केल्यानंतर त्याला स्थगिती देण्यात आली आहे. असे झाले नसते तर छावणी मालक हे उद्यापासून चारा छावणी बंद करणार होते. मात्र आता शरद पवार यांनी मदत केल्यामुळे हा मुद्दा शासनाकडे पोहचवण्याची जबाबदारी सुद्धा त्यांनी घेतली आहे.

पटोदा येथील सौताडा गावातील चारा छावणीला शरद पवार यांनी भेट दिली. तर 27 मार्चला ही चारा छावणी सुरु करण्यात आली होती. मात्र सरकारकडून अद्याप यासाठी कोणतेही अनुदान देण्यात आलेले नाही. त्याचसोबत दुधाचे दर दोन रुपयांनी कमी करण्यात आले आहेत. तर राज्यात सध्या दुष्काळाची परिस्थिती असल्याने शरद पवार दुष्काळ दौऱ्यावर आहेत.(कोल्हापूर: गोकुळ दूध संघ मुख्य कार्यालयावर शिवसेना कार्यकर्त्यांचा धडक मोर्चा, पशुखाद्याचे वाढीव दर कमी करण्याची मागणी)

तर छावणी मालकांनी जनावरांना टॅग लावण्यास सांगितले जाते. तसेच अचूक संख्या असावी हे पाहण्यासाठी आणि शानसाकडे याबद्दल माहिती देण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे एक स्वतंत्र नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी शरद पवार यांच्याकडे करण्यात आली आहे.