Close
Search

Sushant Singh Rajput Case: सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर महाराष्ट्र सरकारची भूमिका स्पष्ट करु- गृहमंत्री अनिल देशमूख

सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुशांत सिंह राजपूत अभिनेता होता. त्यामुळे हे प्रकरण आगोदरच हायप्रोफाईल आहे. मात्र, ते बॉलिवूडपूरते मर्यादित राहिले नाही. आता त्याला राजकीय, पोलीस आणि सीबीआय यांचे अधिकार कार्यक्षेत्र तसेच महाराष्ट्र आणि बिहार या दोन राज्यांतील संघर्ष असे अनेक कंगोरे तयार झाले आहेत.

महाराष्ट्र अण्णासाहेब चवरे|
Sushant Singh Rajput Case: सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर महाराष्ट्र सरकारची भूमिका स्पष्ट करु- गृहमंत्री अनिल देशमूख itemprop="position" content="2">

Sushant Singh Rajput Case: सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर महाराष्ट्र सरकारची भूमिका स्पष्ट करु- गृहमंत्री अनिल देशमूख

सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुशांत सिंह राजपूत अभिनेता होता. त्यामुळे हे प्रकरण आगोदरच हायप्रोफाईल आहे. मात्र, ते बॉलिवूडपूरते मर्यादित राहिले नाही. आता त्याला राजकीय, पोलीस आणि सीबीआय यांचे अधिकार कार्यक्षेत्र तसेच महाराष्ट्र आणि बिहार या दोन राज्यांतील संघर्ष असे अनेक कंगोरे तयार झाले आहेत.

महाराष्ट्र अण्णासाहेब चवरे|
Sushant Singh Rajput Case: सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर महाराष्ट्र सरकारची भूमिका स्पष्ट करु- गृहमंत्री अनिल देशमूख
Home Minister Anil Deshmukh | (Photo Credits: Facebook Live Screenshot)

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या (Sushant Singh Rajput Case) प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) या प्रकरणात आज निर्णय देऊ शकते. न्यायालयाचा निर्णय येऊ द्या. त्यानंतर या प्रकरणात महाराष्ट्र सरकार भूमिका स्पष्ट करेन, अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांनी दिली आहे. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाबाबत प्रसारमाध्यमांनी विचारले असता ते बोलत होते. गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh) यांनी अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली. 'न्यायालयाचा निर्णय येऊ द्या', असे सांगण्यापलीकडे देशमुख यांनी इतर कोणतेही भाष्य करणे टाळले.

सर्वोच्च न्यायालयाने सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तापासाबाबत दाखल झालेल्या सर्व याचिंकावर सुनावणी घेतली. सर्व पक्षकारांच्या बाजू ऐकून घेतल्यानंतर सुनावणी पूर्ण झाली. मात्र, या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला. सर्वोच्च न्यायालय सुशांत सिंह राजपूत प्रकरणात राखून ठेवलेले निर्णय आज देणार आहे. आज सकळी 11 वाजता हा निर्णय न्यायालयाकडून जाहीर होण्याची शक्यता आहे. (हेही वाचा, Sushant Singh Rajput Case: सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस की सीबीआयकडे? सर्वोच्च न्यायालय आज देणार निर्णय)

सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुशांत सिंह राजपूत अभिनेता होता. त्यामुळे हे प्रकरण आगोदरच हायप्रोफाईल आहे. मात्र, ते बॉलिवूडपूरते मर्यादित राहिले नाही. आता त्याला राजकीय, पोलीस आणि सीबीआय यांचे अधिकार कार्यक्षेत्र तसेच महाराष्ट्र आणि बिहार या दोन राज्यांतील संघर्ष असे अनेक कंगोरे तयार झाले आहेत.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापूर्वी सुशांत सिंह राजपूत यांची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हिनेही ट्विट करत वाट पाहात आहे, असे म्हटल आहे. तसेच जस्टीस फॉर सुशांत असा हॅशटॅगही तिने आपल्या ट्विटर पोस्टमध्ये दिला आहे.

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change