केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी एका सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे (National Congress Party) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार टिका केली होती. यामुळे खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी अमित शहाच्या टिकेचा समाचार घेतला आहे. शरद पवारांनी काय केले आहे. हे बाहेरुन आलेल्या व्यक्तीने आम्हाला सांगू नये, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी अमित शहा यांच्यावर पलटवार केला आहे. तसेच शरद पवारांचे नातू यांनीही भाजपच्या पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे. यासाठी शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddav Thackeray) यांनी सामना (Saamna) संपादकीयमधून शरद पवार यांचे नातू रोहित पवारांचे (Rohit Pawar) कौतुक केले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोलापूरात (Solapur) राजकीय सभा घेतली होती. या सभेत त्यांनी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. या टिकेला प्रत्युत्तर देत खासदार सुप्रिया सुळे यांनी अमित शहा यांना खडेबोल सुनावले आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, 'शरद पवारांनी काय केले, हे बाहेरच्या व्यक्तीने महाराष्ट्रात (Maharashtra) येऊन सांगायची गरज नाही. शरद पवार काय आहेत, हे महाराष्ट्राला माहीत आहेत,' असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी अमित शहा आणि भाजपवर हल्लाबोल केला. तसेच शरद पवारांचे नातू रोहीत यांनीही भाजपाला टोकावर धरले आहे. "गरज पडली की साहेब आठवतात आणि निवडणुक आली की, साहेबांनी काय केले? असे प्रश्न निर्माण करतात. भाजपचे सरकार ढोलकी सारखे दोन्हीबाजूने वाजत आहे," असे रोहीत पवार म्हणाले आहेत. हे देखील वाचा-शिवसेना-भाजप युतीत बिघाडी? उद्धव ठाकरे यांच्याकडून दीर्घ पॉझ घेत सूचक वक्तव्य म्हणाले 'काय ते समजून घ्या..'
धक्कादायक म्हणजे, शिवसेना, भाजप युती असताना शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना टोला लगावला आहे. "महाराष्ट्राच्या जडणघडणीत पवारांचे मोठे योगदान आहे. तसेच ते नाकारताही येणार नाही. हे योगदान नरेंद्र मोदी यांनी बारामतीत जाऊन मान्य केले आहे. शरद पवार हे आपल्याला गुरुस्थानी असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी अनेकदा सांगितले आहे. त्यामुळे पवारांचे इतक्या वर्षांचे राजकारण, समाजकारणास मोदी यांनी मान्यता दिली आहे," असे सांगत उद्धव ठाकरे यांनी अमित शहांनी केलेल्या टीकेला उत्तर दिले आहे.