Nagpur Accident: नागपूरमध्ये विचित्र अपघात, भरधाव ट्रकची 12 वाहनांना धडक, 4 जण जखमी
Accident InNagpur PC TWITTER

Nagpur Accident: नागपूर (Nagpur) शहरातील मानकापूर येथील विचित्र अपघात झाला आहे. भरधाव ट्रकने 12 वाहनांना धडक दिल्याने हा अपघात घडून आला आहे. अपघातानंतर रस्त्यावर बराच वेळ वाहतुकांची कोंडी झाली होती. अपघातामध्ये (Accident) 9 कार, एक रुग्णवाहिका आणि दोन दुचाकी वाहनांचा समावेश आहे. दुर्घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि अपघातात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले. (हेही वाचा- मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू)

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रकने भीषण धडक दिल्याने एक कार थेट दुसऱ्या कारवर चढली. यात 9 वाहनांचे नुकसान झाले आहे. ही घटना नागपूरच्या मनकापूर रस्त्यावर झाली. उड्डाण पुलावरून येणाऱ्या भरधाव ट्रकने सिग्लवर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांना धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, या धडकेत सुमारे पाच ते सहापेक्षा कारच भरपूर नुकसान झालं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने अपघातानंंतरचा व्हिडिओ शेअर केला आहे.

अपघातानंतर रस्त्यावर बराच वेळ वाहतुकांची कोडी होती त्याबरोबर वातावरण देखील तापलं होते. अपघतात चार लोक जखमी झाले आहे. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विचित्र अपघातात कार एकमेकांवर चढली आहे. अपघातानंतर रस्त्यावर बराच वेळ लोकांची गर्दी झालेली होती.