Dharashiv Crime: सावत्र आईने मुलाचा काटा काढला, हौदात फेकून केली हत्या, तुळजापूरातील घटना
Crime (PC- File Image)

Dharashiv Crime: धाराशिवमध्ये एका सावत्र आईने 10 वर्षाच्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. मुलगा गाढ झोपेत असताना सावत्र आईने हे कृत्य केल्याचे समोर आली आहे. मुलाला झोपेत असताना हौदात बुडवलं आहे. त्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. पोलिस या प्रकरणी तपासणी करत आहे. (हेही वाचा- रामेश्वर कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी NIA ने दोन संशयितांवर जाहीर केले प्रत्येकी 10 लाखांचे बक्षीस

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग परिसरात घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी चक्र फिरवत आरोपी आईला अटक केले आहे. शिवमल्हार दयानंद घोडके (वय १०) मृताचे नाव आहे. गुरुवारी २८ तारखेला शिवमल्हार वडिलांसोबत घरात झोपला असताना सावत्र आईने त्याला उचलले आणि थेट गावातील हौदात फेकले.

सकाळी उठल्यावर मुलगा घरात नसल्यामुळे वडिलांनी त्याचा शोध घेतला. परंतु तो सापडला नाही.त्यामुळे थेट पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आला. पोलिसांनी तक्रार लिहून घेतल्यानंतर मुलाचा शोध घेण्यास सुरुवात केली. गावातील हौदात शिवमल्हारचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यास त्याची हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरु केली तेव्हा सावत्र आईने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यावेळी पोलिसांना आरोपी आईवर संशय आला. त्यांनंतर आईची पुन्हा चौकशी केली.

नवदुर्ग पोलिस ठाण्यात या प्रकरणी चौकशी सुरु करण्यात आली. पोलिस चौकशीत आईने हत्या केल्याचे कबुल केले. त्यानंतर पोलिसांनी आईवर गुन्हा दाखल करण्यात आला आणि आरोपी आईला अटक करण्यात आले. या घटनेनंतर आरोपीवर परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.