Accident (फोटो सौजन्य - ANI)

Beed Road Accident: बीड जिल्ह्यातून (Beed District) अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. बीड-परळी रस्त्यावर (Beed-Parli Road) घोडका राजुरी फाटाजवळ (Ghodka Rajuri Phata) झालेल्या एका अपघातात (Accident) तीन तरुणांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले. रविवारी पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना जॉगिंग करत असताना एका वेगवान एसटी बसने धडक दिली. या अपघातात तीन जणांना आपला जीव गमवावा लागला.

प्राप्त माहितीनुसार, पाच तरुण त्यांच्या दैनंदिन प्रशिक्षणाचा भाग म्हणून जॉगिंग करत होते. एसटी बसने त्यांना धडक दिली. या अपघातात बालाजी मोरे, ओम घोडके आणि विराज घोडके यांचा जागेवर मृत्यू झाला. जखमी झालेल्या दोन्ही पीडितांवर सध्या स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या भीषण अपघातात गावातील तरुण बळी पडल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. (हेही वाचा - Manu Bhaker's Grandmother-Maternal Uncle Killed In Accident: मनू भाकरवर कोसळला दु:खाचा डोंगर! मामा आणि आजीचा रस्ते अपघातात मृत्यू (Watch Video))

घटनेची माहिती मिळताच पीडित तरुणांच्या कुटुंबियांनी आणि ग्रामस्थांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. अधिकारी अपघाताचे कारण तपासत आहेत. तरुणांच्या अकाली मृत्युने कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या रस्ते अपघातामुळे रस्ता सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. (हेही वाचा - Goa Paragliding Accident: गोव्यात पॅराग्लायडिंग करताना पुण्यातील तरुणीचा मृत्यू; ऑपरेटरनेही गमावला जीव)

मनू भाकरचे मामा आणि आजीचा रस्ते अपघातात मृत्यू -

रविवारी मनू भाकरच्या आजी आणि मामा यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. रविवारी सकाळी 9 वाजता महेंद्रगड बायपास रोडवर स्कूटर आणि ब्रेझा कारच्या धडकेमुळे हा अपघात घडला. ही टक्कर इतकी भीषण होती की, मनू भाकर यांच्या आजी आणि मामा यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून पळून गेला. दोन दिवसांपूर्वीच मनू भाकर यांना राष्ट्रपतींकडून खेलरत्न पुरस्कार मिळाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतले.