Manu Bhaker's Grandmother-Maternal Uncle Killed In Accident: भारताची स्टार नेमबाज मनू भाकर (Manu Bhaker) च्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मनू भाकरचे मामा (Maternal Uncle) आणि आजीचा (Grandmother) एका भीषण रस्ते अपघातात (Accident) मृत्यू झाला. महेंद्रगड बायपास रोडवर हा अपघात घडला. मनू भाकर यांचे मामा युद्धवीर सिंग आणि आजी सावित्री देवी स्कूटरवरून प्रवास करत होते. वृत्तानुसार, चुकीच्या बाजूने येणाऱ्या एका ब्रेझा कारने स्कूटरला धडक दिली. ही टक्कर इतकी भीषण होती की, या अपघातात दोघेही जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मनू भाकरच्या मामा आणि आजीचा अपघातात मृत्यू -
प्राप्त माहितीनुसार, चालक म्हणून काम करणारा युद्धवीर सिंग हे दुर्दैवी घटना घडली तेव्हा कामावर जात होते. तर त्यांची आई सावित्री देवी तिच्या धाकट्या मुलाला भेटण्यासाठी त्यांच्यासोबत लोहारू चौकात गेल्या होत्या. हे दोघेही कल्याण मोड परिसरात पोहोचताच, त्यांना रस्त्याच्या चुकीच्या बाजूने येणाऱ्या भरधाव ब्रेझा कारने धडक दिली. कार चालकाचे नियंत्रण सुटले आणि तो स्कूटरला धडकला. या अपघातात कार रस्त्याच्या कडेला उलटली. (हेही वाचा -Khel Ratna Award 2025: Manu Bhaker, Gukesh D, Harmanpreet Singh आणि Praveen Kumar ठरले यंदाचे खेलरत्न पुरस्काराचे मानकरी)
चालक घटनास्थळावरून फरार -
अपघातानंतर लगेचच ब्रेझाचा चालक घटनास्थळावरून पळून गेला. स्थानिक पोलिसांना या घटनेची माहिती मिळताचं ते तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतांचे मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहेत. अपघातासाठी जबाबदार असलेल्या चालकाला पकडण्यासाठी अधिकाऱ्यांनी शोध मोहीम सुरू केली आहे. (हेही वाचा -Manu Bhaker यांच्या आईचे Neeraj Chopra सोबत हृदयस्पर्शी संभाषण, व्हिडीओ व्हायरल)
मनू भाकरच्या मामा आणि आजीचा अपघातात मृत्यू , पहा व्हिडिओ -
VIDEO | Haryana: International shooting star Manu Bhaker's maternal grandmother and maternal uncle die in a accident in Charkhi Dadri.
ASI Suresh Kumar informs, "We got the information about the accident about a collision of a car and a scooty. Both the persons on the scooty… pic.twitter.com/U6wFpgiVaz
— Press Trust of India (@PTI_News) January 19, 2025
या दुर्घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तसेच लोक मनु भाकर आणि तिच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त करत आहेत. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. तसेच हिट अँड रन चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथक तयार केली आहेत.