महाराष्ट्र: सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, धुम्रपान केल्यास पहिल्या वेळेस 1 हजार रुपयांच्या दंडासह एक दिवस सार्वजनिक सेवा करावी लागणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे
Health Minister Rajesh Tope | (Photo Credits: ANI)

देशभरात कोरोना व्हायरसने (Coronavirus) थैमान घातल्याने नागरिकांना स्वत:सह परिवाराची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच 31 मे पर्यंत लॉकडाऊन कायम राहमार असून या काळात नियमांचे पालन करणे अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या काळात फक्त अत्यावश्यक सेवासुविधा सुरु राहणार आहेत. मात्र पान, तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास पूर्णपणे बंदी आहे. याच कारणास्तव आता कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सार्वजनिक ठिकाणी थुंकणे किंवा धुम्रपान करण्यास मनाई असल्याचे यापूर्वी आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी स्पष्ट केले होते.(Maharashtra Police: गेल्या 24 तासांत कोरोना संक्रमित महाराष्ट्र पोलिसांच्या संख्येत लक्षणीय वाढ, कोरोना बाधितांची एकूण संख्या 2325 वर)

आता राज्यात सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास किंवा धुम्रपान करताना दिसल्यास पहिल्यास वेळेस व्यक्तीकडून 1 हजार रुपयांचा दंड स्विकारण्यात येणार असल्याचे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. त्याचसोबत व्यक्तीला एक दिवस सार्वजनिक ठिकाणी सेवा करावी सुद्धा लागणार आहे.(कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सार्वजनिक ठिकाणी सुपारी, पान आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनासह धुम्रपान करण्यास प्रतिबंध- राजेश टोपे)

तसेच दुसऱ्या वेळेस ही तिच व्यक्ती धुम्रपान किंवा थुंकताना दिसल्यास त्याच्याकडून 3 हजार रुपयांचा दंड स्विकारण्यात येणार आहे. ऐवढेच नाही तर आता 3 दिवस सार्वजिक ठिकाणी सेवा करण्याची शिक्षा सुद्धा दिली जाणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. राज्य सरकार कडून कोरोनाच्या महासंकटाला लढा देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. महाराष्ट्रातील कोरोनाच्या परिस्थिती बाबत बोलायचे झाल्यास शुक्रवारी समोर आलेल्या आकडेवारीनुसार कोविड19 च्या रुग्णांची संख्या 62228 वर पोहचला असून 2098 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 31 मे नंतर लॉकडाऊन नंतर सरकार काय निर्णय घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.