देशसेवेसाठी सदैव तत्पर असणारे महाराष्ट्र पोलिस (Maharashtra Police) आज कोरोना व्हायरस (Coronavirus) सारख्या भीषण विषाणूशी लढा देत आहे. महाराष्ट्रावर आलेले संकट लवकर दूर व्हावे यासाठी आपली शक्ती पणाला लावत आहेत. जनसेवा हीच खरी देशसेवा असे म्हणत या विषाणूला राज्यातून हद्दपार करण्याचा या महाराष्ट्र पोलिसांनी जणू ध्यासच घेतला आहे. मात्र हे सर्व करत असताना या विषाणूने आता या पोलिसांनाही आपल्या जाळ्यात अडकवण्यास सुरुवात केली असून ही संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 114 पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून राज्यात सद्य स्थितीत 2325 पोलीस कोरोना संक्रमित आढळले आहे.
त्याचबरोबर आतापर्यंत कोरोनामुळे 26 महाराष्ट्र पोलिस दगावल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. ही आकडेवारी धक्कादायक असून महाराष्ट्र पोलिसांचे आयुष्यही आता पणाला लागले असेच एकूणच चित्र पाहायला मिळत आहे. Mumbai Hospitals and Clinics Dashboard: मुंबईमधील Non-COVID-19 रुग्णालयांची व क्लिनिकची यादी; एका क्लिकवर जाणून घ्या शहरातील आयसीयू बेड, रुग्णवाहिका व इतर माहिती
In last 24 hours, 114 police personnel have tested positive for #Coronavirus in Maharashtra and 1 personnel has died due to the virus. The total number of COVID-19 infected personnel is now 2,325 in the state and 26 have died so far: Maharashtra Police pic.twitter.com/WuKZ4RFoLY
— ANI (@ANI) May 30, 2020
महाराष्ट्रात सद्य घडीला कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही 62228 झाली आहे. काल (29 मे) च्या दिवसभरात राज्यात कोरोनाचे 2682 नवीन रुग्ण आढळुन आले यासह आता राज्यात 33124 कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत 2098 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. यामध्ये दिलासादायक म्हणजे कालच्या दिवसभरात राज्यात सर्वाधिक म्हणजेच 8381 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, विशेष म्हणजे कोरोनाचा हॉटस्पॉट असणार्या मुंबई महापालिका क्षेत्रातील 7358 एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ आहे. आतापर्यंत राज्यभरात 26,997 रुग्ण बरे झाले आहेत.