महाराष्ट्रामधील कोरोना व्हायरसची (Coronavirus) संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सरकार या संकटाचा सामना करण्यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना राबवत आहे. यातीलच एक भाग म्हणजे रुग्णालये उभारली जात आहेत. मात्र आता रुग्णांची वाढती संख्या पाहता सरकारने खासगी रुग्णालयांमधील बेड्सदेखील कोरोना विषाणू रुग्णांच्या उपचारासाठी राखीव ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अशात पंचाईत झाली आहे ती म्हणजे, नॉन-कोविड (Non-COVID-19) म्हणजेच कोरोना व्हायरस नसलेल्या रुग्णांची. सद्य परिस्थितीमध्ये अशा रुग्णांना नेमक्या कोणत्या रुग्णालयात जावे हेच समजत नाही. हीच समस्या ओळखून प्रोजेक्ट मुंबई (Project Mumbai) या स्वयंसेवी संस्थेने (NGO) रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या बेड्सबाबत माहिती देण्यासाठी डॅशबोर्ड सुरू केला आहे.
या डॅशबोर्डमध्ये सद्य परिस्थितीनुसार अपडेट्स पहायला मिळतील. यामध्ये वर्णक्रमानुसार मुंबईमधील ठिकाणांची यादी देण्यात आली आहे. यामुळे वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाच्या कुटुंबास या यादीनुसार जवळच्या रुग्णालयात दाखल केले जाऊ शकेल. जवळजवळ 25 स्वयंसेवकांनी हा डॅशबोर्ड तयार केला आहे. यामध्ये बालरोग, ह्रदयरोग, केमोथेरपी, डायलिसिस, प्रसूती आणि गरोदरपणाशी संबंधित सुविधांची यादी आहे. या डॅशबोर्डमध्ये आयसीयू स्थिती, रिक्त असलेले जनरल बेड आणि रुग्णवाहिका उपलब्धता यांचा समावेश आहे. (हेही वाचा: महाराष्ट्रात 'कोरोना व्हायरस'मुक्त झालेल्या रुग्णांनी गाठला उच्चांक; आज एकाच दिवशी 8381 रुग्ण बरे होऊन गेले घरी)
अशाप्रकारे या डॅशबोर्डमध्ये तुम्ही तुमच्या परिसरातील नॉन -कोविड रुग्णालयांची माहिती प्राप्त करू शकता.
पहा यादी -
- अंधेरी पूर्व: अॅपेक्स हॉस्पिटल
- अंधेरी पश्चिम: ब्रह्मा कुमारिज यांचे ग्लोबल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर
- वांद्रे पश्चिम: वांद्रे होली फॅमिली हॉस्पिटल
- भांडुप: क्रिटीकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल
- भांडुप पश्चिम: डॉ मीना मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल
- बोरिवली वेस्ट: लोटस हॉस्पिटल
- बोरिवली वेस्ट: ट्रिनीटी हॉस्पिटल
- भायखळा: बालाजी हॉस्पिटल
- चेंबूर: अपोलो हॉस्पिटल
- चेंबूर पूर्व: झेन हॉस्पिटल
- चिंचबंदर: साबू सिद्दीकी हॉस्पिटल
- कुलाबा: इंदू क्लिनिक कुलाबा
- दहिसर पूर्व: तन्वी नर्सिंग होम
- दहिसर पूर्व: प्रगती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
- धारावी: धन्वंतरी नर्सिंग होम
- घाटकोपर (पू): डॉ अमित शाह क्लिनिक
- घाटकोपर पश्चिम: ग्लोबल नर्सिंग होम
- गिरगाव: जैन कॉन्व्हेस्ट हॉस्पिटल
- गिरगाव: ब्राह्मण सभा रुग्णालय
- गोरेगाव पूर्व: ममता नर्सिंग होम
- गोरेगाव पश्चिम: श्री साई क्लिनिक
- ग्रँट रोड: फौजिया हॉस्पिटल
- कांदिवली पश्चिम: पार्थ हॉस्पिटल
- खेरवाडी, वांद्रे पूर्व: शकुंतल चित्र नर्सिंग होम
- कुर्ला पूर्व: चिंतामणी रुग्णालय
- कुर्ला पश्चिम: न्यू नूर हॉस्पिटल
- माहीम पश्चिम: राहुल नर्सिंग होम
- मलबार हिल: एलिझाबेथ हॉस्पिटल
- मलबार हिल: रुक्समणी हॉस्पिटल
- मालाड पूर्व: एम.डब्ल्यू. देसाई हॉस्पिटल गोविंद नगर
- मालाड वेस्टः लाईफलाईन आयसीसीयू मातृत्व आणि नर्सिंग होम
- मालाड वेस्ट: हयात मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल
- मालाड वेस्ट: सुराणा हॉस्पिटल
- मांडवी: नूर हॉस्पिटल (मातृत्व गृह)
- माटुंगा पश्चिम: सरस्वती नर्सिंग होम
- मुलुंड पूर्व: स्पंदन रुग्णालय
- मुलुंड वेस्ट: प्लॅटिनम हॉस्पिटल
- परळ: ग्लोबल हॉस्पिटल
- प्रभादेवी: आशा सर्जिकल
- प्रभादेवी: सिद्धिविनायक हॉस्पिटल
- प्रभादेवी: कोळी रुग्णालय
- सांताक्रूझ: वेलकेअर हॉस्पिटल
- सांताक्रूझ पूर्व: प्रेरणा नर्सिंग होम
- सांताक्रूझ पूर्व: सिल्व्हर कॉईन नर्सिंग होम
- सांताक्रूझ पूर्व: संजीवनी नर्सिंग होम
- सायन वेस्ट: लाइफ केअर हॉस्पिटल
- तारदेओ: अपोलो हॉस्पिटल
- विलेपार्ले पूर्व: बाबासाहेब गावडे रुग्णालय
याबाबत बोलताना प्रोजेक्ट मुंबईचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिर जोशी म्हणाले, ‘आम्ही प्रत्येक रुग्णालयाशी संपर्क साधून, त्यांच्याकडे बेड व सेवांच्या उपलब्धतेबद्दल विचारणा करायला सुरुवात केली. त्यानंतर आम्ही आमचे काम सुरु केले व आता दिवसातून दोनदा आमची टीम हा डॅशबोर्ड अपडेट करण्यासाठी रुग्णालयांशी संपर्क साधतो. सध्या आमच्याकडे 75 रुग्णालयांचे निरीक्षण करणारे 25 स्वयंसेवक आहेत.’ जोशी पुढे म्हणाले, ‘हे सारे स्वयंसेवक कॉर्पोरेट कर्मचारी आहेत मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये ते प्रकल्पाला समर्पित आहेत.’ अशा प्रकारे सध्या परिस्थितीमध्ये या एनजीओद्वारे लोकांना मदत करण्याचा प्रयत्न सुरु आहे.