Flight | Representational Image (Photo Credits: Pixabay)

पुणेकरांसाठी आता एक गूडन्यूज आहे. पुणे शहरातून आता भारतामध्ये 5 शहरांना SpiceJet त्यांच्या नॉन स्टॉप फ्लाईट्सने जोडणार आहे. दरम्यान ही विमानसेवा 28 मार्चपासून सुरू होणार आहे. काही दिवसांपूर्वीच स्पाईसजेटने ही माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारा जाहीर केली आहे. पुण्यासोबतच मुंबई ते गोवा आणि राजकोट या मार्गावरही विमानसेवा वाढवत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

भारतातील लहान शहरांमधूनही आता विमान प्रवासासाठी मागणी वाढत असल्याने मेट्रो सिटीज सोबतच विमानसेवेचं जाळं इतर शहरातही वाढवलं जात आहे.

पुणे शहरातून आता नियमित पुणे-दरभंग़ा, पुणे-दुर्गापूर, पुणे-ग्वालियार, पुणे-जबलपूर आणि पुणे-वाराणसी या मार्गांवर विमानसेवा सुरू केली जाणार आहे. सोबतच नाशिक-कोलकाता हे सेक्टर देखील जोडलं जाणार आहे. दरम्यान या भागांमध्ये थेट विमानसेवा सुरू करणारी स्पाईसजेट ही पहिली भारतीय एअरलाईन ठरली आहे. आता रोज फ्लाईट्स उपलब्ध होत असल्याने अनेकांना हे सोयीचं होणार आहे.

पुण्यासोबत मुंबईकरांनाही आता मुंबई-लेह, श्रीनगर लेह, हैदराबाद-मुंबई, मुंबई हैदराबाद, मुंबई-सुरत, सुरत-मुंबई, कोची-पुणे, पुणे-कोची ही नियमित नॉन स्टॉप फ्लाईट्स सुरू होत आहेत. स्पाईसजेट्स कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार नव्या नॉनस्टॉप विमानसेवेकरिता Boeing 737 ,Bombardier Q400 एअरक्राफ्ट्स सुरू केली जाणार आहेत. महाराष्ट्र: सिंधुदुर्ग येथील चिपी विमानतळ सुरु होण्यासाठी लोकांना आणखी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार.

केंद्र सरकारच्या उडाण मोहिमेद्वारा भारतामध्ये मोठ्या शहरांसोबतच लहान शहरांमध्येही विमानसेवा पोहचली आहे. तसेच जनसामान्यांसाठी देखील विमान प्रवास आवाक्यात आला आहे. महाराष्ट्रात कोकणातही चिपी  विमानतळाची लोकांना प्रतिक्षा आहे. केंद्रीय यंत्रणांच्या मंजुरी नंतर लवकरच ते देखील नागरिकांना खुले केले जाणार आहे.