पत्राचाळ घोटाळा प्रकरणी (Patra Chawl Land Scam Case) अटकेत असलेल्या संजय राऊत (Sanjay Raut) यांना काही दिवसांपूर्वी जामीन नाकारत कोर्टात अजून 14 दिवस न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवलं आहे. दरम्यान स्पेशल पीएमएलए कोर्टाने (Special PMLA Court) दिलेल्या माहितीनुसार, संजय राऊत यांच्या जामीनावर 27 सप्टेंबर पासून सुनावणी सुरू होणार आहे. तसेच संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि त्यांचे भाऊ प्रविण राऊत यांच्या जामीनावर 23 सप्टेंबर पर्यंत सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता आहे. प्रविण राऊतांच्या सुनावणीनंतर आता 27 सप्टेंपासून संजय राऊतांच्या सुनावणीला सुरूवात केली जाणार आहे.
पत्राचाळ जमीन घोटाळ्यामध्ये ईडीच्या समन्स दोनदा टाळल्याने 31 जुलैला सकाळी ईडीने मुंबईत संजय राऊतांच्या राहत्या घरी धाड टाकली. दिवसभराच्या चौकशीनंतर रात्री उशिरा पोलिस स्टेशन मध्ये संजय राऊत यांच्यवर अटकेची कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे सुरूवातीला ईडी कार्यालयात आणि नंतर आर्थर रोड जेल मध्ये असलेले संजय राऊत जामीनासाठी प्रयत्न करत आहेत. हे देखील नक्की वाचा: Patra Chawl Land Scam Case: Sanjay Raut यांच्या जामीनाला ED ने कोर्टात उत्तर दाखल करत दर्शवला विरोध.
पहा ट्वीट
Special PMLA Court to start hearing on Shiv Sena MP Sanjay Raut's bail plea from September 27. Court is likely to complete hearing on co-accused Pravin Raut's bail plea by Sept 23 & then it'll start hearing Sanjay Raut's bail plea from Sept 27 pic.twitter.com/ZufBjvf5FA
— ANI (@ANI) September 21, 2022
दरम्यान मीडीया रिपोर्ट नुसार, संजय राऊत यांचा पाय अजून खोलात गेला आहे. त्यांनी जमा केलेला काळा पैसा राऊत एन्टरटेनमेंट एलएलपी कंपनीत गुंतवत त्यांनी 'ठाकरे' सिनेमा केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. स्वप्ना पाटकर या त्यांच्या केस मधील साक्षीदाराने 'एप्रिल 2021 मध्ये अधिग्रहित केलेल्या मद्य कंपनीमध्ये राऊतांचे व्यावसायिक हितसंबंध आहेत असा दावा केला आहे.' त्यामुळे संजय राऊतांच्या जेल मध्ये वाढ होणार की बेल मिळणार याची उत्सुकता वाढली आहे.