Solapur Lok Sabha Constituency (Photo Credits: Twitter)

Solapur Lok Sabha Constituency Election Results 2019: लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Elections 2019) साठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरु झाली असून, निकालही हाती येण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील एकूण 48 लोकसभा मतदारसंघांपैकी एक असलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघ आणि या मतदारसघातील उमेदवारांचे मताधिक्यही हाती येत आहे. या मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde), भाजपचे डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी (Dr. Jayshiddheshwar Swami) आणि वंचित बहुजन आघाडी सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यात लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Elections 2019) साठी जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. दरम्यान, एक्झिट पोल्सनी भाजप-शिवसेना युतीला अनुकूल तर, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला प्रतिकूल अंदाज दर्शवले आहेत. या पार्श्वभूमीवर हाती येत असलेली निकालाची आकडेवारी उत्सुकता वाढवणारी आहे.

जाणून घ्या महाराष्ट्रासह संपूर्ण भारताचा निकाल एका क्लिकवर, पाहा लाइव अपडेट्स

सुशीलकुमार शिंदे आणि प्रकाश आंबेडकर या दिग्गजांसमोर भारतीय जनता पक्षाने डॉ. जयसिद्धेवर स्वामींनी निवडणूक लढवल्यामुळे आता सोलापुर मतदारसंघामध्ये चुरशीची लढत होणार आहे.

त्यामुळे सुरुवातीला काँग्रेस विरुद्ध भाजप असा दुरंगी वाटणारा सामना आता तिरंगी झाला आहे. त्यामुळे याही मतदारसंगातील लढतीकडे राज्याचे आणि देशाचे लक्ष लागले आहे.

प्रकाश आंबेडकर यंदा पहिल्यांदाच आकोला शहराबाहेरील मतदार संघातून लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. सोलापूर मतदार संघामध्ये 18 एप्रिल 2019 दिवशी मतदान पार पडले.