रविवारी महाराष्ट्रातीलसह देशातील जनता पीएम मोदी यांच्या दिवे लावणाय्च्या आवाहनाबाबत चर्चा करण्यात मग्न होती. अशात संध्याकाळी सोलापूर शहरातील विमानतळावर भीषण आग लागली. या घटनेमध्ये सध्या तरी कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे. या आगीचे कारणही अद्याप समजू शकलेले नाही. अहवालानुसार विमानतळाभोवती पसरलेले कोरडे गवत आहे आणि त्यामुळे ही आग क्षणार्धात पसरली. सध्या प्रशासन ही आग नक्की का लागली ते शोधण्याचा प्रयत्न करीत आहे.
या आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाकडून मोठ्या प्रयत्नाने आग विझवण्याचा प्रयत्न केला. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे, मात्र फटाक्यामुळे आग लागल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. या आगीमध्ये विमानतळाचेही कोणतेही नुकसान झाले नाही. स्थानिक अग्निशमन अधिकारी केदार आवटे यांनी सांगितले की, ही आग संध्याकाळी सातच्या सुमारास लागली आणि आता ती नियंत्रणात आणण्यात आली आहे. (हेही वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या घराबाहेर मोठ्या समईमध्ये दिपप्रज्वलन करुन उपक्रमात दिले मोलाचे योगदान, पाहा ही सुंदर रोषणाई)
There is nothing to worry about the fire near solapur airport in solapur
As guardian minister I just spoke to collector solapur and all is under control #StayHomeStaySafe
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 5, 2020
आता याबाबत सोलापूरचे पालकमंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही ट्वीट करत माहिती दिली आहे. सोलापूर विमानतळाजवळ लागलेल्या आगीची चिंता करण्याची काहीच गरज नाही. पालकमंत्री म्हणून आपले सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणे झाले आहे व परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे, असे ते आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात.