कोरोना सारख्या गंभीर विषाणूपासून देशाला वाचविण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. या ते न केवळ एक पंतप्रधान म्हणून देशाची सेवा करत आहेत तर देशवासियांचे अशा कठीण प्रसंगी मनोधैर्य वाढविण्याचे काम करत आहेत. 22 मार्चला जनता कर्फ्यूमध्ये त्यांनी थाळ्या आणि टाळ्या वाजविण्याचे जनतेस आवाहन केले होते. त्यानंतर आज मोदींनी रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी घराबाहेर दिवे लावण्यास सांगितले होते. त्यांच्या या उपक्रमाला देशवासियांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्याचा एक भाग म्हणून स्वत: नरेंद्र मोदी यांनी आपल्या घराबाहेर दीपप्रज्वलन करुन या उपक्रमात सहभाग घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या दारात दिव्यांची आरास केली होती. त्यासोबत एक भव्य समई पेटवली होती. हा नजारा खूपच उत्साहवर्धक आणि चैतन्यपूर्ण असा होता.
पाहा फोटोज:
शुभं करोति कल्याणमारोग्यं धनसंपदा ।
शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तुते ॥ pic.twitter.com/4DeiMsCN11
— Narendra Modi (@narendramodi) April 5, 2020
या उपक्रमाला संपूर्ण देशविसायिांनी भरघोस प्रतिसाद दिला. यांच्यासह भाजप ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक नेत्यांनी यात सहभाग घेतला.
कोरोनाचा प्रभाव अधिक वाढू नये म्हणून देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन (Lockdown) घेण्यात आला आहे. या संकटावर मात करण्यासाठी देशवासियांनी एकजूट दाखवावी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दिवे लावण्याची संकल्पना मांडली होती.