'जय श्री राम' हे नारे संसदेत नको, त्यासाठी मंदिरे आहेत: खासदार नवनीत कौर
नवनीत कौर राणा (फोटो सौजन्य-ANI)

संसदेत सदस्यत्वाची शपथ घेताना काही खासदारांनी जय श्री रामाचे नारे दिले. त्यामुळे महाराष्ट्रातील खासदार नवनीत कौर राणा (Navneet Kaur Rana) यांनी संसदेत जय श्री राम हे नारे नकोत त्यासाठी मंदिरे आहेत असे विधान केले आहे. तर श्री राम यांच्या नावाने नारे संसदेत लावणे अयोग्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तरनवनीत कौर या महाराष्ट्रातील अमरावतीच्या खासदार आहेत.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. आज पार पडलेल्या अर्थसंकल्प अधिवेशनाच्यावेळी सगळ्या सदस्यांनी शपथ घेतली.

पुन्हा एकदा निवडून आलेल्या मोदी सरकारचे आज पहिले अधिवेशन पार पडले. यंदा लोकसभा निवडणूकीत भाजपला 303 जागांवर विजय मिळवता आला.

(विधानसभा पावसाळी अधिवेशन: धनंजय मुंडे यांनी टीम इंडिया साठी मांडला अभिनंदन ठराव, सभासदांचं एकमताने अनुमोदन)

मात्र संसदेत जय श्री रामाचे नारे लगावणाऱ्या खासदारांवर नवनीत कौर यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच सगळ्या देवांना मानते. परंतु एखाद्याला लक्ष करण्यासाठी असे करणे योग्य नसल्याचे ही कौर यांनी म्हटले आहे.