विधानसभा पावसाळी अधिवेशन: धनंजय मुंडे यांनी टीम इंडिया साठी मांडला अभिनंदन ठराव, सभासदांचं एकमताने अनुमोदन
महाराष्ट्र राज्य विधिमंडळ (Photo Credit : Youtube)

महाराष्ट्र मंत्री मंडळाचा विस्तार कार्यक्रम पार पडल्यावर आज 17 जून पासून विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला (Maharashtra Assembly monsoon Session) सुरवात झाली. खरतर सत्तेतली आणि विरोधी पक्षातील राजकीय मंडळी एकत्र आल्यावर आरोप प्रत्यारोप, भांडणं इतकंच काय तर प्रसंगी मारामारीच्या घटना देखील आजवर तुम्ही ऐकल्या असतील.पण आज, विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde)  यांनी संसदेत मांडलेल्या एका ठरावावर सर्व सभासंदांनी आनंदाने अनुमोदन दिल्याचा प्रसंग समोर आला आहे. कालच्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात टीम इंडिया (Team India)ला मिळालेल्या यशाचे कौतुक करून त्यांना अभिनंदन करण्याचा हा ठराव मांडल्याची माहिती मुंडे यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून दिली आहे.

धनंजय मुंडे ट्विट

आयसीसी विश्वचषक सामन्यात काल विराट ब्रिगेड ने पाकिस्तानी संघाला 89 धावांनी मागे टाकत दणदणीत विजय मिळवला, विश्वचषकाच्या इतिहासात हा भारताने सातव्यांदा पाकिस्तानी संघाचा पराभव केला आहे. या निमित्ताने काल पासूनच देशात जोरदार सेलिब्रेशन सुरु आहे अनेक राजकीय मंडळींनी देखील टीम इंडियावर कौतुकांचा वर्षाव केला आहे, धनंजय मुंडे यांनी देखील भारतीय संघाला शुभेच्छा देऊन अभिनंदन करण्याचा प्रस्ताव आज विधानसभेत मांडला त्यानंतर सर्व सदस्यांनी याला टाळ्या वाजवून अनुमोदन दिले. IND vs PAK, ICC World Cup 2019: "भारताचा पाकिस्तान वर आणखीन एक स्ट्राईक", अमित शहा यांचं टीम इंडियासाठी खास ट्विट

दरम्यान मागील काही दिवसांपासून धनंजय मुंडे हे सरकारी जमीन लागल्याच्या आरोपावरून कायद्याच्या कचाट्यात सापडले होते मात्र आता त्यांना न्यायालयाकडून दिलासा देण्यात आला आहे. त्यानंतर आजपासून सुरु झालेल्या विधानसभा पावसाळी अधिवेशनात मुंडे विरोधी पक्ष नेता म्हणून रुजू झाले आहेत.