Thane Crime: ठाण्यात गेल्या आठवड्यात पाळीव कुत्र्याचा ग्रुमींग सेंटरमध्ये एका पाळीव कुत्र्याला दोन कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या घटनेअंतर्गत पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे ही घटना ताजी असताना ठाण्यातून आणखी एक खळबळजनक घटना समोर आली आहे. ६ कुत्र्यांना विष देऊन देऊन हत्या केल्याची माहिती उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवला गेला आहे. ( हेही वाचा- कारच्या धडकेत कुत्रा ठार)
मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील गणेशपूरी भागात सहा कुत्र्यांना विष देऊन ठार मारण्यात आले आहे. भिंवडी येथील रहिवासी मनीषा पाटील यांनी पोलिसांना तक्रार केली आहे. तक्रारीत म्हटल्याप्रमाणे, २ पाळीव कुत्र्यांना 21 फेब्रुवारीच्या सकाळी उलट्या होऊ लागल्या आणि त्यानंतर लगेचच त्यांचा मृत्यू झाला. परिसरात त्यानंतर पुन्हा अशीच एक घटना घडली. काशिनाथ रावते, दिनेश जाधव आणि रवींद्र रावते यांनी देखील पोलिसांकडे तक्रार केली की त्यांचे पाळीव कुत्रे अशाच प्रकारे मरण पावले होते. त्याच दिवशी एका भटक्या कुत्र्याचाही मृत्यू झाला.
सहा कुत्र्यांमध्ये पाच पाळीव आणि एक भटक्या कुत्रा होता. दोन लॅब्राडॉर, आणि एक जर्मन शेफर्डचा समावेश होता. पोलिसांना तक्रार नोंदवला असून अद्याप कोणालाही अटक केले नाही. अज्ञात आरोपींविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 428 (कोणत्याही प्राण्याला मारणे, विष देऊन, अपंग करणे किंवा निरुपयोगी करणे) अंतर्गत गुन्हा 22 फेब्रुवारी रोजी नोंदवण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. परिसरातील प्राणी प्रेमींनी प्राण्याच्या सुरक्षतेवर प्रश्न चिन्ह उभा केला आहे.