Beed: धक्कादायक! भररस्त्यात जावायाने केली सासूची हत्या, बीड जिल्ह्यातील केज साळेगाव येथील घटना
Representational Image | (Photo Credits: PTI)

सध्या संपूर्ण महाराष्ट्र (Maharashtra) कोरोनाशी झंज देत असताना बीड (Beed) येथून सर्वांना हादरून टाकणारी माहिती समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील केज साळेगाव येथे जावायाने सासूची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याशिवाय, सासूसोबत असलेल्या तिच्या पुतण्यावरही त्याने प्राणघातक हल्ला केला आहे. ज्यात तोदखील गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. या हल्ल्यानंतर जावई फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीच्या अटकेसाठी पथक नेमले आहेत, अशी माहिती पोलीस अधिकारी भास्कर सावंत यांनी दिली आहे.

लोचना माणिक धायगुडे (वय,35) असे मृत सासूचे नाव आहे. तर, अंकुश दिलीप धायगुडे असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. लोचना आणि अंकुश हे अंबाजोगाई तालुक्यातील धायगुडा पिंपळा येथील रहिवाशी आहेत. लोचना आणि पुतण्या अंकुश दिलीप धायगुडे हे दुचाकीवरुन केजकडे जात होते. यावेळी साळेगावजवळ रस्त्यावरच आरोपी अमोल वैजनाथ इंगळे यांची आणि लोचना यांच्यात बाचाबाची झाली. याचदरम्यान, अमोलने लोचना आणि अंकुश यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. त्यानंतर अमोल घटनास्थळावरून फरार झाला, अशी माहिती लोकमतने त्यांच्या वृत्तात दिली आहे. हे देखील वाचा- Satara: साताऱ्याच्या मेरुलिंग-मेढा घाटात भीषण अपघात; कार दरीत कोसळल्याने 3 जणांचा मृत्यू, 5 गंभीर जखमी

या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. तसेच या हत्येमागचे नेमके कारण काय? याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. याप्रकरणी केज पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.