धक्कादायक! मोबाईल गेमचे आमिष दाखवत एका तरूणाकडून 6 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार
Image Used for Representational Image Only | (Photo Credits: Latestly/Illustration)

मोबाईल मध्ये गेम खेळायला देण्याचे आमिष दाखवत एका तरुणाने 6 वर्षीच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना लातूर (Latur) जिल्ह्यातील अहमदपूर (Ahmadpur) तालुक्यात घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडाताने आपल्यासोबत घडलेला सर्वप्रकार तिच्या आईला सांगितला. त्यानंतर आईने वेळ न घालवता स्थानिक पोलिसात जाऊन आरोपीच्या विरोधात तक्रार नोंदवली. पीडित मुलीगी आपल्या आईसह 13 जानेवारी रोजी अहमदपूर येथे आली होती.

सचिन संजय गिरी असे आरोपीचे नाव असून तो अहमदपूर तालुक्यातील शेनकूड गावातील रहिवाशी आहे. सचिनने पीडित मुलीला खाऊ देऊन मोबाईलवर गेम खेळू असे म्हणत घरात नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. पीडिताने घरी गेल्यानंतर सर्वप्रकार आपल्या आईच्या कानावर टाकला. त्यानंतर पीडिताच्या आईने जवळील पोलिस ठाण्यात सचिन विरोधात तक्रार नोंदवली. या तक्रारीवरुन सचिन गिरीविरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. तसेच याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत. हे देखील वाचा-Thane: 24 वर्षीय युवकाचा शेजारी राहणाऱ्या 5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार; पोलिसांकडून अटक

बलात्कार गुन्ह्याच्या अधिक घटना समोर येऊ लागल्या असून याप्रकरणातील गुन्हेगारांना कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी देशभरातून केली जात आहे. त्याचबरोबर मुलींच्या सुरक्षतेमध्ये अधिक सुधारणा व्हावी, यासाठी प्रशासनाकडून अधिक प्रयत्न केले जात आहेत.