Vaibhav Naik | (Photo Credits: Facebook)

शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप (BJP) एकेकाळचे नैसर्गिक मित्र असलेले हे दोन्ही मित्र. आज एकमेकांच्या उभे ठाकले आहेत. इतके की एकमेकांवर कुरघोडी आणिक आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी शोधत नाहीत. शिवसेना आज आपला 55 वा वर्धापन दिन (Shivsena 55th Anniversary) साजरा करत आहे. वर्धापन दिनानिमित्त शिवसेना आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी एक हटका उपक्रम आयोजित केला आहे. भाजप सदस्यत्वाचे ओळखपत्र दाखवा आणि एक लिटर पेट्रोल फ्री मिळवा असा हा उपक्रम आहे. शिवसेना वर्धापन दिनानित्त असा उपक्रम हाती घेऊन नागरिकांनाक दिलासा देण्याचा प्रयत्न आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. पण त्याच सोबत वाढत्या इंधन दरांवरुन केंद्र सरकारमध्ये सत्तेत असलेल्या भाजपला टोला लगावण्याची संधीही सोडली नाही.

शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी ट्विटरवर पोस्ट लिहीत दिलेल्या माहितीनुसार, भाजप सदस्यत्वाचे ओळखपत्र दाखवल्यास 1 लिटर पेट्रोल मोफत मिळणार आहे. तर, सर्वसामान्य नागरिकांना अवघ्या 100 रुपयांमध्ये 2 लिटर पेट्रोल (प्रति वाहन) मिळणार आहे. वैभव नाईक यांनी सुरु केलेल्या या उपक्रमाची सोशल मीडियात भलतीच चर्चा रंगली आहे. शिवसेना आमदाराच्या या अभियानामुळे या दोन्ही पक्षात पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. (हेही वाचा, Shivsena 55th Anniversary: अंगावर याल तर हिशेब करायला शिवसैनिक मागेपुढे पाहत नाहीत; वर्धापनदिनी शिवसेनेचा भाजपला इशारा)

वैभव नाईक यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, शिवसेनेच्या 55 व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वसामान्य नागरिकांना 100 रुपयांत 2 लिटर पेट्रोल (प्रति वाहन) आणि भाजप सदस्यत्वाचे ओळखपत्र दाखवणाऱ्यांना प्रत्येकी 1 लीटर पेट्रोल मोफत वाटप करण्यात येणार आहे.

वैभव नाईक ट्विट

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राज्याचे पर्यटनमंत्री, शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांचा वाढ दिवस साजरा झाला. त्या वेळीही शिवसेनेकडून माफक दरात पेट्रोल-डिझेल उपलब्ध करुन देण्यात आले होते. त्या वेळी युवा सेना पदाधिकऱ्यांनी राबविलेल्या उपक्रमाला मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य नागरिकांनी प्रतिसाद देत गर्दी केली होती. त्या वेळीही केंद्र सरकारला पेट्रोल-डिझेल दरवाढीवरुन केंद्र सरकारला चपराक लावण्याचाच शिवसेनेचा प्रयत्न होता.