आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) दोन दिवसीय छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) दौर्यावर असताना आज त्यांचा मुक्काम असलेल्या रामा हॉटेल बाहेर भाजपा कार्यकर्त्यांनी राडा घातला आहे. 'आदित्य ठाकरे हाय हाय' म्हणत त्यांनी घोषणाबाजी केली आहे. अभिनेता सुशांत राजपूत च्या मॅनेजरच्या आत्महत्या प्रकरणी आदित्य ठाकरे यांनी उत्तर द्यावं अशी मागणी देखील यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी केली आहे.
छत्रपती संभाजीनगर मध्ये दोन्ही गट एकमेकांसमोर आल्यानंतर काही काळ परिस्थिती तणावग्रस्त झाली होती. पोलिसांनी यावेळी सौम्य लाठीचार्ज केला. तसेच ठाकरे गटाच्या काही कार्यकर्त्यांची धरपकड देखील केली आहे. आदित्य ठाकरे सध्या महाराष्ट्र स्वाभिमान यात्रा वर आहेत. या आंदोलनानंतर ते पैठण ला सभेला पोहचले आहेत.
छत्रपती संभाजीनगर मध्ये ठाकरे गट- भाजपा एकमेकांविरूद्ध
#WATCH | Maharashtra: A scuffle broke out between Shiv Sena (UBT) and BJP workers in Chhatrapati Sambhajinagar, after the latter protested against Aaditya Thackeray's visit to the city. pic.twitter.com/rQ1kvfZno6
— ANI (@ANI) August 26, 2024
अंबादास दानवे यांनी यामध्ये भाजपा कार्यकर्त्यांना का ताब्यात घेण्यात आले नाही? असा सवाल विचारला आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी संभाजीनगर मध्ये दाखल होताच त्यांना देखील ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आले होते त्याचप्रमाणे आज आदित्य ठाकरेंच्या दौर्यालाही भाजपा कडून अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. नक्की वाचा: Narendra Modi On Badlapur Sexual Assualt Case: महिला अत्याचाराप्रकरणारील गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी; बदलापूर प्रकरणावरुन पंतप्रधान मोदींचे भाष्य.
आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया
आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या विरूद्ध झालेल्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना काल नरेंद्र मोदींविरूद्ध झालेलं आंदोलन हे राज्यात शक्ती कायदा आणण्यासाठी, पोलिसांवर हल्ल्याचा विरोधात होते. आम्ही पक्षाच्या विरूद्ध नाही तर विकृतीच्या विरोधात आंदोलन केले. ज्यांना भाजपा घाबरते, त्याला बदनाम करण्याचं राजकारण भाजपा करतं असा आरोप आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला आहे.