अनिल परब यांना समर्थन देण्यासाठी शिवसैनिक सरसावले, मुंबईत लागले बॅनर्स
मंत्री अनिल परब | (File Photo)

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  (CM Uddhav Thackeray) यांच्या विरोधात केलेल्या विधानानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. याच दरम्यान नारायण राणे यांना अटक ही करण्यात आली. मात्र आता शिवसेनेचे मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यावर वारंवार टीका केली जात असून ते आता भाजपच्या रडावर आहेत. या सर्व घटनेत अनिल परब यांनी नारायण राणे यांच्या अटकेची सूचना देत असल्याची क्लिप व्हायरल झाल्याचे बोलले जात आहेत. त्यामुळे आता नारायण राणे यांनी सर्व प्रकरणे उघडून दाखवून असा इशारा अनिल परब यांना दिला होता.

परंतु आता अनिल परब यांच्या समर्थनार्थ जोगेश्वरी येथे शिवसेनेकडून बॅनर्स लावण्यात आले आहेत. बॅनरवर असे लिहिण्यात आले आहे की, संकटाच्या छाताडावर तांडव करणाऱ्यांनाच शिवसैनिक म्हणतात. पुढे असे ही म्हटले की, अनिल परब साहेब आम्ही सदैव तुमच्यासोबत आहोत. सदर बोर्ड हा नरसेवक राजू श्रीपाद पेडणेकर यांनी लावला आहे.(महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर; प्रज्ञा सातव, आशिष देशमुख यांना संधी)

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आरोप लावत आहे की, राज्याचे गृहमंत्री नक्की कोण आहेत? अनिल परब यांची नारायण राणे यांना अटक करण्याची सुचना दिल्याची क्लिप व्हायरल झाल्यानंतर फडणवीस अधिक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे आता असे ही प्रश्न उपस्थितीत केले जात आहे की, यामागे खरंच अनिल परब यांचा हात आहे का? या व्यतिरिक्त भाजपने व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिप नंतर या प्रकरणी सीबीआय तपास करावा अशी मागणी केली आहे.(नारायण राणे यांची छत्रपती संभाजी महाराजांशी तुलना; शिवसेना आमदाराची भाजप नेत्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार)

तसेच भाजपने क्लिप समोर आल्यानंतर कोर्टात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपचे असे म्हणणे आहे की, राणे यांना झालेली अटक ही केवळ व्यक्तीगत शत्रुत्वाच्या कारणामुळे केली गेली आहे. त्यांच्यावर जे काही कलम लावले गेले ते बेलेबल होते. तरीही राणे यांना अटक झाली. या प्रकरणी आता कोर्टात लवकरच सुनावणी पार पडणार आहे.