महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर; प्रज्ञा सातव, आशिष देशमुख यांना संधी
Congress | (File Image)

आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने (Maharashtra Pradesh Congress) नवी कार्यकारिणी (Congress Executive Committee) जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारिणीत नवे उपाध्यक्ष, महासचिव, सचिव, प्रवक्ते, पदाधिकारी यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव (Dr. Pradnya Satav) यांच्यावर उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. विशेष म्हणजे यात आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनाही संधी देण्यात आली आहे. (Zeeshan Siddique यांची मुंबई युवा काँग्रेस अध्यक्षपदी निवड)

शिस्तपालन कमिटीचे अध्यक्ष म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. तर अमरजित मनहास यांच्याकडे खजिनदार पद देण्यात आलं आहे. काँग्रेस नेते माणिक जगताप यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलीला संधी देण्यात आली आहे. आशिष  देशमुख यांना जनरल सेक्रेटरी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर वैद्यकीय उच्च शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे भाऊ आणि आमदार धीरज देशमुख जनरल सेक्रेटरी पदाची जबाबदारी सांभाळतील. त्याचबरोबर शैलेश शिवराज पाटील जनरल सेक्रेटरी म्हणून जबाबदारी पाहतील. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांकडे जनरल सेक्रेटरी पद देण्यात आले आहे. तर सचिन गुंजाळ सचिवपदी असतील.

प्रदेश कमिटीत 190 पैकी मराठा-43, मुस्लिम 28,  ब्राह्मण 11, ओबीसी 11, एस सी 10, धनगर 7, आगरी 6, लिंगायत 6, माळी 5, मारवाडी 4, मातंग 4 अशा पद्धतीने वेगवेगळ्या जातींना स्थान देण्यात आलं आहे. या कमिटीमध्ये केवळ 17 महिलांचा समावेश आहे. याशिवाय कमिटीत 30-40 या वयोगटातील 17, 41-50 या वयोगटातील 62, 51-60  या वयोगटातील 78, 61-70  या वयोगटातील 32 आणि 70 पेक्षा अधिक वय असणारी एक व्यक्ती आहे.