Nitesh Rane | Photo Credits: Twitter)

शिवसेना मुखपत्र दै. सामना संपादकीयातून भाजप नेते राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe Patil) पाटील यांच्यावर सडकून टीका केली. तसेच, कोकणातील भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावरही अप्रत्यक्ष टीका केली. या टीकेनंतर भाजप नेते नारायण राणे यांचे पूत्र आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी शिवसेनेला इशारा दिला आहे. आपल्याकडे काही पत्रं आहेत. ही पत्र तळकोकणातील प्रहारमधून लवकरच छापतो, असे ट्विट नितेश राणे यांनी केले आहे.

नितेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ''सामनाच आमच्यावर प्रेम आहे. असणारच. का नाही असणार. शेवटी Old is gold. पण.. काँग्रेसच्या थोरातांची इतकी चिंता पण ग्रामीण भागातल्या जुन्या कडवट शिवसेनेच्या नेत्यांना विचारायच पण नाही. काही "पत्र"आहेत माझ्या कडे. तळकोकणच्या प्रहार मधुन लवकरच छापतो. मग बघु कशी कुरकुर होते.''

काय म्हटले आहे सामनात

''महाराष्ट्राचे 'ठाकरे सरकार' स्थीर आहे. एकमेकांचा मानसन्मान राखत राजशकट हाकले जात आहे. फार पूर्वी 'थोरातांची कमळा' हा चित्रपट गाजला होता. आता 'विखे-पाटलांची कमळा' असा एक चित्रपट आला व पडला. काँग्रेसची खाट कुरकुरतेय की नाही ते पाहू, पण विखेंटी 'टूर अँण्ड ट्रॅव्हल' कंपनी बंद पडली आहे. मात्र, त्याचया टुटटूर सुरु आहे. वैफल्य, दुसरे काय! भाजपाच्या गोधडीत शिरुन ठाकरे सरकारवर टीका करणाऱ्या बाटग्यांचे आम्हाला आश्चर्य वाटते. असे एक-दोन बाटगे नगर जिल्ह्यात आहेत आणि दोनेक पावटे तळकोकणात आहेत. मूळ पक्षात सर्व काही भोगून आणि मिळवून सत्तेसाठी पक्षांतरे करणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करत नाही आणि हे प्रत्येकाच्या बाबतीत दिसून आले'' (हेही वाचा, अजित पवार चालवतायत राज्य, बाकीचे फक्त फेसबुक लाईव्ह करण्यात व्यस्थ; नितेश राणे यांचे खरमरीत ट्विट)

दरम्यान, नितेश राणे यांनी आणखी एक ट्विट करत शिवसेना खासदार आणि सामना संपादक संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. ही टीका करताना आपल्या ट्विटमध्ये राणे यांनी म्हटले आहे की, “‘सामना’च्या राऊत सारखे बाजारात खूप लोक आहेत. पवारांना भेटले की फडणवीसांबद्दल उलट बोलायचं. राणेंना भेटले की ठाकरेंबद्दल उलट बोलायचं. ठाकरेंना राणेंबद्दल उलट बोलायचं. राज्यपाल भेटले की पवारांबद्दल उलट बोलायचं. असं करून स्वतःची किंमत संपवली! ना भावाला मंत्री,ना स्वतः संपादक!”.