अजित पवार (Ajit Pawar) हे खऱ्या अर्थाने राज्य चालवत आहेत, बाकी लोक केवळ फेसबुक लाइव्ह (Facebook Live) करण्यामध्ये व्यस्थ आहेत,' असे म्हणत भाजपचे आमदार नीतेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी ट्विटच्या माध्यमातून उपमुख्यमंत्र्यांचे कौतुक केले आणि त्याच वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना अप्रत्यक्षपणे टोला सुद्धा लगावला आहे. आपल्या ट्विट मधून, अजित पवार यांचे कौतुक करताना नितेश यांनी पोलीस व आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांसह राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार कपातीचा निर्णय मागे घेतल्याबद्दल अजित पवारांचे आभार मानले, 'शेवटी अनुभव महत्त्वाचा असतो. अजित पवारच खऱ्या अर्थानं राज्य चालवताहेत हेच त्यांनी या निर्णयातून दाखवून दिलंय. असेही त्यांनी ट्विट मध्ये म्हंटले आहे. मात्र याच्या पुढे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांनी इतर काही लोक केवळ फेसबुक लाइव्हमध्ये दंग आहेत.'असे म्हणत अप्रत्यक्षपणे टोलावले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद; गेल्या 3 दिवसांत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 93 कोटी जमा
माध्यमांनी दाखवलेल्या वृत्तानुसार कोरोना व्हायरसच्या संकटामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर तणाव येत आहे, परिणामी, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्यात येईल अशी माहिती समोर येत होती. ज्यावरून, पोलीस व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा पगार का कापला जातोय असा सवालही करण्यात आला होता. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या वृत्ताचे खंडन करत कोणाचाही पगार कापला जाणार नाही मात्र तो टप्प्या टप्प्यात दिला जाईल असे स्पष्ट केले होते. या निर्णयावरूनच नितेश राणे यांनी अजित पवार यांचे कौतुक केले आहे.
नितेश राणे ट्विट
Thank u @AjitPawarSpeaks saheb for taking back the decision of not cutting salaries of police men n health workers!
After all experience always speaks n u have shown that ur running the state indeed 😊 while others r busy doing FB lives
— nitesh rane (@NiteshNRane) March 31, 2020
दरम्यान, कोरोनाच्या संकट काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संयमी कामाचे सर्व स्तरातून कौतुक आहे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले आहे. मात्र अशावेळी नितेश राणे यांनी अशी टीका करणे हे नेटकऱ्यांना सुद्धा रुचलेले नाही, त्यांच्या या ट्विट वर अनेकांनी कमेंट करून उद्धव ठाकरे यांचे समर्थन केले आहे. दुसरीकडे राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या मागील २४ तासात वाढून ३२० वर पोहचली आहे, त्यामुळे आजपासून लॉक डाऊन बाबतचे निर्णय करण्यात आले आहेत.