Sanjay Raut on ED: ईडीच्या छापेमारीवरून संजय राऊत संतापले, भाजपला दिला 'हा' इशारा
Sanjay Raut (Photo Credit: ANI)

महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब (Anil Parab) यांना ईडीने (ED) समन्स बजावले आहे. तसेच आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी उद्या त्यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगितले आहे. ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात थिणगी पडली आहे. तसेच नारायण राणे यांच्या अटकेमुळे शिवसेनेला लक्ष्य केले जात असून भाजप (BJP) सुडाचे राजकारण करत असल्याचे आरोप शिवसेनेकडून केला जात आहे. याचप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीत आमचेही दिवस येतील, असाही इशारा त्यांनी विरोधकांना दिला आहे.

संजय राऊत यांनी नुकताच प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी म्हणाले की, शिवसेनेच्या नेत्यांवर गेला काही दिवसांपासून कारवाया सुरु आहेत. शिवसेना ही ईडीचे लक्ष्य आहे. परंतु, याचा थोडाही परिणाम महाविकास आघाडीवर होणार नाही. ज्याला कर नाही, त्याला डर कशाला? आम्ही कोणत्याही कारवाईला सामोरे जाऊ शकतो, असे संजय राऊत म्हणाले आहेत. तसेच राज्यात सूडाची भावना आणि बिनबुडाचे राजकारण सुरु आहे. सगळ्याचे दिवस येतात. दिल्लीत आमचेही दिवस येतील, असाही इशारा संजय राऊत यांनी त्यावेळी दिला आहे. हे देखील वाचा- Antilia Bomb Scare and Mansukh Hiren Murder Cases: NIA कडून Sachin Waze आणि Sunil Mane यांच्या कस्टडीची मागणी Special NIA Court ने फेटाळली

अनिल परब यांना ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली आहे, याची माहिती संजय राऊत यांनीच दिली होती. त्यानंतर राजकारणात एकच खळबळ माजली होती. त्यावेळी संजय राऊत यांनी ईडीच्या नोटीस हे राजकीय नेत्यांसाठी डेथ वॉरंट नाही, प्रेमपत्र असल्याचे म्हटले होते. महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात अयशस्वी ठरल्यानंतर अशा प्रेमपत्रांची संख्या वाढली आहे, असा टोलाही संजय राऊत यांनी विरोधकांना लगावला होता.