Sanjay Raut Tweets to Amit Shah:  संजय राऊत यांचा इशारा 'आता बस्स!; आरोप सिद्ध करा किंवा कायदेशीर कारवाईला सामोरे जा'
Sanjay Raut, Amit Shah | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) हे आता चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ED (Enforcement Directorate) द्वारे नोटीस आली आहे. मात्र, या नोटीशीचा संबंध विरोधकांकडून थेट पीएमसी (PMC) आणि एचडीआयएल (HDIL) घोटाळ्याशी जोडला जात आहे. यावरुन संजय राऊत यांनी 'आता बस्स! (Enough Is Enough) आरोप सिद्ध करा किंवा कायदेशीर कारवाईला सामोरे जा' असे म्हटले आहे. संजय राऊत यांनी ट्विटरद्वारे हा इशारा दिला आहे. तसेच, हे ट्विट त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनाही टॅग केले आहे. तसेच 'समजने वालों को इशारा काफी हैं' असेही म्हटले आहे. त्यामुळे राऊत यांचा रोख कोणाकडे आहे हे स्पष्ट होत आहे.

संजय राऊत  यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, माझ्या कुटुंबीयांना अंमलबजावई संचालनालय विभागाची नोटीस आली. त्याबाबतचे वृत्त आल्यानंतर गोदी मीडियातील काही कमळं अचानक फुलत आहेत. परंतू, केवळ राजकीय दबावासाठी, राजकीय सूड उगवण्यासाठी पिंजऱ्यातील पोपटांना कोशा प्रकारे सोडतात हे सर्वांनाच माहिती आहे. माझ्या कुटुंबाचे नाव पीएमसी आणि एचडीआयएल घोटाळ्याशी नाहक जोडले जात आहे. आता हे सिद्ध करा किंवा कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. आता बस्स झालं! समझनेवाले को इशारा काफी है', असं संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. (हेही वाचा, Sanjay Raut on ED Notice: ज्यांच्याकडे लपविण्यासारखे असते ते भाजप प्रवेश करतात- संजय राऊत)

दरम्यान, ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास वर्षा राऊत यांनी काहीसा कालावधी मागितल्याच्या वत्ताला संजय राऊत यांनी दुजोरा दिला आहे. ईडीचा तो कोगद आम्हाला मिळाला आहे. परंतू मी तो कागद अद्याप पाहिला नाही. ईडीने ही नोटीस पाठवली असली तरी आम्ही त्याचा आदर करतो. शेवटी तीही एक स्वतंत्र संस्था आहे. आपण अशा संस्थांचा आदर करायला हवा, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

संजय राऊत यांनी ईडीवरही हल्ला चढवला आहे. गेल्या काही काळात ईडी ज्या प्रकारचे वर्तन करत आहे. ते पाहता मला ईडीची किव येते. ईडीला, सीबीआय, एनसीबी यांसारख्या संस्थांना पूर्वी एक नाव होते. त्यांची एक प्रतिष्ठा होती. परंतू, अलिकडील काळात या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचेही संजय राऊत यांनी काल म्हटले होते.