अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या (Sushant Singh Rajput Suicide Case) प्रकरणाचा तपास सीबीआय (CBI) या संस्थेकडे सोपविण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यानंतर मुंबई पोलीस, महाराष्ट्र सरकार आणि खास करुन शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याबाबत विविध प्रतिक्रिया उमटल्या. यातील काही समर्थनात तर काही विरोधात होत्या. यात टीका करणाऱ्यांना संजय राऊत यांनी आपल्या शायराना अंदाजात टोला लगावला आहे. 'संजय ऊवाच' शिर्षकाखाली 'किस्मत पे इतना नाज ना करे..हमने बारिशों मे भी जलते हुए मकान देखे है' असा एक शेर राऊत यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.
संजय राऊत यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या शेरमध्ये कोणाचाही नामोल्लेख किंवा कोणताही हॅशटॅग नाही. मात्र, सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेल्यावर काही तासांतच राऊत यांनी ट्विट केले आहे. त्यामुळे राऊत यांनी मुंबई पोलीस, महाविकासआघाडी सरकार आणि त्यांच्यावर होणाऱ्या टीकेला आणि टीकाकारांनाच प्रत्युत्तर दिल्याचे मानले जात आहे. “उनसे कहना की.. किस्मत पे इतना नाज ना करे.. हमने बारिशों मे भी जलते हुए मकान देखे है…” असा शेर राऊत यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. (हेही वाचा, सीबीआयकडून सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येसारखा होऊ नये- शरद पवार)
::संजय ऊवाच::
"उनसे कहना की..
किस्मत पे इतना नाज ना करे..
हमने बारिशों मे भी
जलते हुए मकान देखे है..."
जय महाराष्ट्र!!
— Sanjay Raut (@rautsanjay61) August 20, 2020
शिवसेना खासदार संजय राऊत हे आपल्या खोचक शब्दातं प्रतिक्रिया देणारे व्यक्तिमत्व म्हणून परिचीत आहेत. अनेकदा ते आपले वक्तव्य, सोशल मीडियावर व्यक्त केलेली मतं आणि लिहिलेल्या लेखांमुळे चर्चेत असतात. शिवसेना पक्षाची भूमिका प्रसारमाध्यमांतून आणि विविध मंचावरुन संजय राऊत ठासून मांडतात. त्यासाठी अनेकदा ते ट्विटरवर शायराना अंदाजही दाखवतात. या आधीही राऊत यांनी वेगवेगळे शेअर ट्विटरवर शेअर केले आहेत.