संजय राउत (Photo Credits: PTI)

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) शनिवारी बेळगाव (Belgaum) दौऱ्यावर गेले असता तेथे तणावाची परिस्थिती दिसून आली. मात्र त्यांनी एका कार्यक्रमाला उपस्थितीत लावली असता त्यांची मुलाखत घेण्यात आली. याच पार्श्वभुमीवर संजय राऊत यांनी कश्मीर मुद्द्यावर तोडगा निघतो तर बेळगावच्या मुद्द्यावर सुद्धा तोडगा निघू शकतो असा सवाल केंद्रीय गृह मंत्रालयाला केला आहे. एवढेच नाही तर बेळगावचा प्रश्न गृहमंत्री अमित शहा यांनी मध्यस्थी केल्यास यावर तोडगा निघणे शक्य होईल असे सुद्धा संजय राऊत यांनी म्हटले आहे.

एनआयने दिलेल्या वृत्तानुसार, बेळगावात लाखो मराठी लोक राहतात आणि ते त्यांच्या भाषेसह संस्कृतिचे अनुसरण करतील. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी भाषेचे विभाजनापासून सीमा विभाजन वेगळे करण्याचे आवाहन करतो. या व्यतिरिक्त महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सुद्धा आवाहन करतो की, दोन्ही मुख्यमंत्र्यांनी तातडीने हा प्रश्न सोडविण्यासाठी तोडगा काढावा असे आवाहन संजय राऊत यांनी केले आहे.(इतिहासावर किती बोलणार? देशासाठी काम केलं तर सावरकर यांना अभिमान वाटेल; आदित्य ठाकरे यांचा संजय राऊत यांना टोला)

कश्मीर मधील कलम 370 हटवण्याचा निर्णय घेण्यात आला अशाच पद्धतीचा ठोस निर्णय घेतला. मात्र त्यांनी आता बेळगावच्या मुद्द्याकडे सुद्धा अमित शहा यांनी लक्ष द्यावे असे संजय राऊत यांनी विधान केले आहे. यापूर्वी संजय राऊत यांनी बेळगावात जाण्याच्या कथित रुपात बंदी घालण्यावर भाजपच्या नेतृत्वाखालील कर्नाटक सरकारवर टीका केली होत. त्यावेळी संजय राऊत यांनी असे म्हटले होते की, पाकिस्तानी आणि रोहिंग्या भारतात येऊ शकतात तर आम्ही बेळगावात का नाही जाऊ शकत? असा सवाल केला होता