इतिहासावर किती बोलणार? देशासाठी काम केलं तर सावरकर यांना अभिमान वाटेल; आदित्य ठाकरे यांचा संजय राऊत यांना टोला
Sanjay Raut And Aaditya Thackeray (Photo Credits: ANI)

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut)  यांनी वीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या विरोधकांना अंदमानाच्या (Andaman)  तुरुंगात राहण्याची शिक्षा अनुभवायला हवी असे विधान आज सकाळी केले होते, ज्यावर प्रतिक्रया देताना पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी राऊत यांना इतिहासातून बाहेर येऊन आता देशासाठी काम करण्याचा सल्ला दिला आहे. संजय  राऊत यांचे विधान वैयक्तिक आहे, त्याचा संदर्भ पक्षाशी जोडण्याची आवश्यकता नाही, तसेच जेव्हा महाविकास आघाडी एकत्र आली तेव्हा काही मुद्द्यांवर मतभेद कायम असणार हे माहीतच होते मात्र विकासासाठी आम्ही एकत्र आलो आणि त्यालाच लोकशाही म्हणतात, असे मत आदित्य यांनी माध्यमांसमोर व्यक्त केले, "वीर सावरकर आणि इतिहासाचा अभिमान आहेच पण  देशाचा विकास घडवल्यास वीर सावरकर यांनी देखील निश्चितच अभिमान वाटेल असे म्हणताना आदित्य यांनी संजय राऊत यांच्या विधानावर थेट शब्दात टोला लगावला. आजच्या क्षणोक्षणीच्या ठळक घडामोडी पाहण्यासाठी क्लिक करा  

ANI ट्विट

काय म्हणाले होते संजय राऊत?

वीर सावरकर यांच्या विरोधकांना संजय राऊत यांनी खडेबोल सुनावताना "जे सावरकर यांना भारतरत्न देण्याला विरोध करतात किंवा त्यांच्या बाबत गैर बोलतात त्या सर्वांनी एकदा अंदमान ला जाऊन किमान दोन दिवसांसाठी सेल्युलर जेल मध्ये राहून बघावे आणि मग बोलावं असे म्हंटले होते.

ANI ट्विट

दरम्यान, यापूर्वी देखील अनेकदा वीर सावरकर हा महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाचं मुद्दा ठरला आहे. भाजप शिवसेना युतीपासून ते आता दोन्ही पूर्व मित्रपक्षांमध्ये होत असणाऱ्या टोलेबाजीपर्यंत अनेक ठिकाणी सावरकर यांच्या मानाचे संदर्भ पाहायला मिळतात. मध्यंतरी सरकार स्थापनेनंतर राहुल गांधी यांनी आपण माफी मागायला राहुल सावरकर नाही असे म्हंटले होते तेव्हा सुद्धा हा वाद समोर आला होता, ज्यावर शिवसेनेने उत्तर देत आम्ही एकत्र असलो तरी या विधानाशी सहमत नाही असे म्हणत आपली बाजू मांडली होती.