शबाना आजमी यांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्यावर वर्सोवा येथील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूर टोलनाक्याजवळ झालेल्या भीषण अपघातात जखमी झाल्या होत्या. त्यांना कळंबोली येथील महात्मा गांधी रुग्णालयात (एमजीएम) उपचार सुरू होते. मात्र, आत त्यांना कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

सन 2020 या वर्षाच्या हज यात्रेसाठी संगणकीय सोडत अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते नुकतीच पार पडली. केंद्रीय हज समितीच्या हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात राज्यातील 10 हजार 408 जणांची हज यात्रेसाठी झाली निवड झाली.ट्विट

नाईट लाईफ अर्थात हॉटेल्स, पब चोवीस तास सुरु ठेवण्याचा निर्णय सध्या तरी मुंबई शहरापुरताच आहे. मात्र, तसा प्रस्ताव आल्यास पुणे शहातही हॉटेल्स, पब रात्रभर सुरु ठेवण्यावर विचार करण्यात येईल असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांना गुजरात पोलीसांनी अटक केली आहे. अहमदाबाद जिल्ह्यातील वीरमगाम येथे त्यांना अटक करण्यात आली. राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखाली आजच त्यांना अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले होते. त्यानंतर काही तासांमध्येच त्यांना अटक करण्यात आली आहे.एएनआय ट्विट

नागरिकत्व संशोधन कायदा (CAA)  संसदेत मंजूर करण्यात आल्याने तो सर्व राज्यांना लागू करावाच लागेल. तसे करणे बंधनकारक आहे. कोणतेही राज्य हा कायता लागू करणार नाही, असे बोलता येऊ शकत नाही, असे भूवया उंचावणारे आणि तितकेच महत्त्वपूर्ण विधान ज्येष्ठ वकील आणि काँग्रेस नेते कपील सिब्बल यांनी केले आहे.एएनआय ट्विट

पीटीआय ट्विट

 वनविभाग आणि संबंधित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी साहेबराव वाघाला भूल देऊन कृत्रिम पाय बसवला. परंतू, अर्थवट शुद्धीवर येताच साहेबरावने पाय आपटून कृत्रीम पाय काढून टाकला. त्यामुळे हा प्रयोग अयशस्वी ठरल्याची माहिती डॉ. सुश्रृत बाभुळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.पीटीआय ट्विट

अभिनेत्री शबाना आजमी यांच्या कारला आज सायंकाळी अपघात झाला. मुंबई पुणे महारार्गावर खालापूर टोलनाक्यानजिक झालेल्या या अपघातात आजमी जखमी झाल्या. त्यांच्या अपघाताचे वृत्त समजतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन दुख: व्यक्त केले तसेच, त्यांना लवकरच बरे वाटावे यासाठी प्रार्थना केली आहे.पंतप्रधान मोदी ट्विट

शिर्डी वरुद्ध पाथर्डी असा वाद अधिकच धुमसू लागला आहे. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी आज मध्यरात्री 12 वाजलेपासून अनिश्चित काळासाठी शिर्डी बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, बंद असला तरी साईबाबा मंदिर आणि प्रसादालय सुरु राहणार आहे.

 मॅरेथॉन स्पर्धेमुळे बेस्ट बस वाहतूकीवरही परिणाम होणार आहे. बेस्ट बसच्या काही फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही बस अन्य मार्गांवर वळवण्यात आल्या आहेत. प्राप्त माहितीनुसार, रविवारी दुपारी 3.30  वाजेपर्यंत बसमार्ग क्रमांक 105,106, 108, 112, 123, 125, 132, 133, 136 आणि 155 हे काही काळासाठी (तात्पुरते) रद्द करण्यात आले आहेत. यासोबतच मॅरेथॉन स्पर्धा असलेल्या रस्त्यांवरील बसचौक्याही दुपारी 3.30 पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.  त्यामुळे भेंडी बाजार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडून श्यामाप्रसाद मुखर्जी चौक, कुलाबा, नेव्हीनगरकडे असे असणारे बसमार्ग हे सरदार वल्लभभाई पटेल मार्ग, वाडीबंदर, पी. डीमेलो रोड आणि शहीद भगतसिंग या मार्गे राहतील.

  • दक्षिण, मध्य मुंबईमध्ये येणारे सुमारे 71 मार्ग रविवारी पहाटे पाच ते दुपारी 2 या काळासाठी बंद असणार आहेत.
  • 28 प्रमुख रस्त्यांवर वाहने उभी करण्यास प्रबंद
  • मुंबईतील सर्व सार्वजनिक, स:शुल्क वाहनतळांचा वापर करता येणार.
  •  दक्षिण, मध्य मुंबईतील बेस्ट आगारांमध्येही वाहने उभी करण्यास मान्यता.

Load More

सीमा लढ्यातील शहिद हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगाव (Belgaon) येथील हुतात्मा चौकात गेलेल्या महाराष्ट्राचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना काल 17  जानेवारी रोजी कर्नाटक पोलिसांनी (Karnatak Police)  अटक केल्यामुळे महाराष्ट्र- कर्नाटक वादाची ठिणगी अजूनच पेटली आहे. यातच भर म्ह्णून आज शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे देखील पोलिसांना आव्हान करत कर्नाटकात जाणार आहेत. "हिंमत असेल तर मला कायद्याने अडवून दाखवा" असे आव्हान राऊत यांनी दिले असून आज दुपारी 2 वाजता ते कर्नाटक मध्ये दाखल होणार आहेत.

सीमा लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना दरवर्षी 17 जानेवारी रोजी बेळगावच्या हुतात्मा चौकात अभिवादन केले जाते. मात्र यंदा या दिवशी कोणत्याही राजकीय व्यक्तींना बेळगावात येणयापासून मज्जाव करण्यात आला होता, असे असूनही काल राज्य आरोग्य मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर हे शुक्रवारी मध्यरात्रीच बेळगावात दाखल झाले होते. कोणताही सरकारी फौजफाटा न घेता गेल्याने ते सुरवातीला कोणाच्या नजरेत आले नाहीत.मात्र हुतात्मा चौकात अभिवादन करण्यासाठी पोहचताच पोलिसांनी त्यांना अडवून धक्काबुक्की करत अटक केली. याच्या विरुद्ध आज यड्रावकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याही संवाद साधणार आहेत

आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या

दरम्यान, राजकीय वातवरण जरी पेटले असले तरी राज्यात तापमानाचा पारा काही दिवसांपासून वर जाण्याचे नाव घेत नाहीये. महाराष्ट्र सह देशभरात थंडीची लाट पसरली असून आज सकाळी मुंबई मध्ये 20 , नाशिक आणि निफाड मध्ये 5 डिग्री दिल्ली मध्ये 11 डिग्री आणि उत्तर प्रदेश मध्ये 13 डिग्री वर तापमान उतरले आहे.