केंद्राच्या मोदी सरकारमध्ये शिवसेनेचे (Shiv Sena) एकमेव मंत्री अरविंद सावंत (Arvind Swant) यांनी केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नसून रविवारी भाजपने आम्ही सत्ता स्थापन करणार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र निवडूकीच्या पूर्वीच शिवसेनेने 50-50 च्या फॉर्म्युल्यानुसार सत्ता वाटप होईल असे सांगितल्याने भाजपने त्याचा विरोध केला. त्यामुळे आता फॉर्म्युला नकारुन शिवसेनेला खोटे ठरवण्याचा प्रकार धक्कादायक आहे. त्याचसोबत महाराष्ट्राच्या स्वाभिमानास कंलंक लावणारा असून खोटेपणाचा कळस महाराष्ट्रात भाजपने फारतकत घेतली असल्याचे अरविंद सावंत यांनी म्हटले आहे.
तसेच अरविंद सावंत यांनी ट्वीट करत असे ही म्हटले की, शिवसेनेची सत्याची बाजू आहे. त्यामुळे खोट्या वातावरणात दिल्लीतील सकारकार मध्ये का रहायचे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. याच कारणामुळे अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा दिला असल्याचे सांगितले आहे. केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आज सकाळी 11 वाजता अरविंद सावंत दिल्लीत पत्रकार परिषद घेणार आहेत.(Maharashtra Government Formation: शिवसेनेला सत्ता स्थापनासाठी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्याकडून निमंत्रण)
शिवसेनेची बाजू सत्याची आहे. अशा खोट्या वातावरणात दिल्लीतील सरकार मध्ये तरी का रहायचे?
आणि म्हणूनच मी केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा देत आहे. या संदर्भात आज सकाळी ११.०० वा. दिल्ली येथे मी पत्रकार परिषद (Press Conference) घेणार आहे.
— Arvind Sawant (@AGSawant) November 11, 2019
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीत भाजपला 105 जागा आणि शिवसेनेला 56 जागांवर विजय मिळवता आला आहे. शिवसेना अधिक मते मिळवणारा राज्यातील दुसरा मोठा पक्ष निवडूकीच्या निकालानंतर दिसून आले. परंतु भाजप-शिवसेना युतीने बहुमताचा आकडा पार केला, पण 50-50 च्या फॉर्म्युल्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये मतभेद दिसून आले. त्यामुळे महाराष्ट्रात अद्याप सत्ता स्थापन करण्यात यश आले नाही. तर राज्यपाल यांच्याकडून आधी भाजपला सत्ता स्थापनासाठी आमंत्रण देण्यात आले. भाजपच्या शिष्टमंडळांनी भगत सिंग कोश्यारी यांची भेट घेत सत्ता स्थापन करणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर आज संध्याकाळी 7.30 वाजेपर्यंत शिवसेनेला सत्ता स्थापनासाठी वेळ देऊ करण्यात आला आहे. त्यामुळे आता शिवसेना राष्ट्रवादी पक्षासोबत सत्ता स्थापन करणार का याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.