shivsena | (Photo Credit: File Photo)

आगामी लोकसभा निवडणूकांच्या (Lok Sabha Election)  पार्श्वभूमीवर सध्या अनेक पक्षांमध्ये आयाराम - गयाराम उमेदवार आहेत. भाजपामध्ये अनेक पक्षांमध्ये मोठे नेते, त्यांची मुलं आणि इच्छुक उमेदवारांची जोरदार एंट्री सुरू आहे. मात्र आज शिवसेनेला एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर( MLA Suresh Dhanorkar) यांनी शिवसेनेला राम राम ठोकत आज आमदारकीचा राजीनामा दिला आहे. लवकरच ते कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

ANI Tweet

बाळू धानोरकर हे शिवसेनेचे विदर्भातील आमदार आहेत. आमदारकीसोबतच त्यांनी आज शिवसेनेच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. लोकसभेसाठी धानोरकर इच्छुक आहेत. मात्र युतीकडून तिकीट मिळणार नसल्याने त्यांनी कॉंग्रेसची वाट धरली आहे. स्थानिक राजकारणामध्ये धानोरकरांचे हंसराज अहीर यांच्यासोबत असलेले मतभेददेखील कारणीभूत असल्याच सांगितलं जात आहे.

चंद्रपूरमधून काँग्रेसचे विलासराव मुत्तेमवार यांच्या मुलाला तिकीट देण्याचा विचार सुरू होता मात्र त्याला होत असलेला विरोध पाहता आता धानोरकरांच्या नावाचा विचार होऊ शकतो. काही दिवसांपूर्वी धानोरकरांनी अशोक चव्हाणांची भेट घेतली असून येत्या काही दिवसात ते राहुल गांधीच्या भेटीला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.