ठाकरे गटातील शिवसैनिकांनी रस्त्यावर गोमूत्र शिंपडलं (PC - Twitter)

Eknath Shinde Aurangabad Visit: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) आज औरंगाबाद (Aurangabad) दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री आज ज्या रस्त्याने गेले त्या रस्त्यावर शिंदे गटातील शिवसैनिकांनी गोमूत्र शिंपडलं. रस्ता शुद्ध व्हावा म्हणून शिवसेनेकडून हे अनोखं आंदोलन करण्यात आलं. औरंगाबादमधील बिडकीन येथे हा प्रकार घडला. मुख्यमंत्र्यांच्या पैठण दौऱ्यावेळी ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. यावेळी ठाकरे गटातील शिवसैनिकांनी 50 खोके, एकदम ओकेच्या घोषणाही दिल्या. यावेळी शिंदे गट आणि शिवसेनेचे दोन्ही गट आमने-सामने आले.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी गोमूत्र शिंपडणाऱ्या शिवसैनिकांना ताब्यात घेतलं आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणमध्ये मुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे. त्यांच्या याच दौऱ्याची जोरदार तयारी शिंदे गटाकडून सुरु असताना कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरेंच्या कार्यकर्त्यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. (हेही वाचा - Bidkin: लाडू तुला, पेढे मला.. पळा पळा, एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रम स्थळी  पळवापळवी; 21 सेकंदात खुर्दा, बिडकीन येथील घटना)

या ऑडिओ क्लिपमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी पैसे देऊन गर्दी जमवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच 250 ते 300 रुपये देऊन महिलांना सभेसाठी आणावे, असेही ऑडिओ क्लीपमध्ये संभाषण आहे. परंतु, ही ऑडिओ क्लीप केव्हाची आहे? यासंदर्भात कोणतीही स्पष्टता नाही.