Portrait of Chhatrapati Shivaji Maharaj (Photo Credits: ANI)

तिथीनुसार आलेल्या शिवजयंती (Shiv Jayanti) निमित्त आज मुंबईत अनेक ठिकाणी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज प्रत्येक शिवभक्त आपापल्या परीने आपल्या लाडक्या आराध्य दैवताला मानवंदना देत आहेत. पण आपल्या कलाकौशल्यातून शिवरायांना मानवंदना देण्यासाठी मुंबईतील एका अवलियाने एक वेगळीच रचना घडवली आहे. आपल्या कलेतून मुंबईतील नितीन कांबळे या कलाकाराने जागतिक विक्रम घडवला आहे. यात त्याने 46,080 प्लास्टिक मण्ंयांमधून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा साकारली आहे. नितीन कांबळे एका खासगी कंपनीसाठी अॅनिमेटर म्हणून काम करतो.

जवळपास 46,080 प्लास्टिक मण्यांमधून साकारलेली शिवरायांची प्रतिमा ही तब्बल 10X8 फूट लांब आहे. ही प्रतिमा साकारण्यास नितीनला जवळपास 10 दिवस लागले. या प्रतिमेसाठी त्यांनी वेगवेगळ्या रंगांचे मणी वापरले आहेत. मुंबई: तिथीनुसार शिवजयंती 2020 निमित्त शिवसेनेकडून पश्चिम द्रुतगती महामार्ग, CSIA जवळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला मानवंदना (Photos)

याबाबत ANI ने नितीन कांबळेला विचारले असता, "प्लास्टिकला भारतात बंदी घालण्यात आली आहे. मात्र अजूनही बाजारात काही ठिकाणी प्लास्टिकच्या वस्तू आहेत. म्हणूनच यातून काहीतरी चांगली कलाकृती साकार होऊ शकते हे मला जगाला दाखवून द्यायचे होते." यासाठी मी भुवनेश्वर येथून मणी विकत घेतले. यात 7 रंगांचा वापर करण्यात आला आहे असंही तो पुढे म्हणाला.

या प्रतिमेची जागतिक विक्रम म्हणून नोंद करण्यात आली आहे. हा माझाला पहिला जागतिक विक्रम असल्याचे नितीन कांबळे ने सांगितले आहे. मला भविष्यात अनेक क्रांतिवीरांची प्रतिमा साकारायची आहे असेही त्याने पुढे सांगितले.