मुंबई: तिथीनुसार शिवजयंती 2020 निमित्त शिवसेनेकडून पश्चिम द्रुतगती महामार्ग, CSIA जवळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला मानवंदना (Photos)
Uddhav Thackeray and Aditya Thackeray (Photo Credits: ANI)

तिथीनुसार आलेल्या शिवजयंतीनिमित्त आज शिवसेनेकडून विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी विशेष उपस्थिती लावली. त्यांच्या समवेत त्यांचा मुलगा तसेच पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी विशेष उपस्थिती लावली. आज सकाळी त्यांनी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर (CSIA) आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर (WEH) छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन मानवंदना दिली.

तिथीनुसार आलेल्या शिवजयंती निमित्त आज मुंबईत ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना व्हायरसच्या सावटामुळे मुंबईत शिवजयंती निमित्त बरेच कार्यक्रम रद्द करण्यात आले. मात्र शिवसेनेकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळाला. म्हणून शिवसेना अध्यक्ष तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज CSIA वर जाऊन शिवाजी महाराजांच्या भव्य दिव्य अशा पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली. त्यानंतर पश्चिम द्रुतगती महामार्गावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याल हार अपर्ण करुन दर्शन घेतले.

ANI चे ट्विट:

हेदेखील वाचा- Shiv Jayanti 2020 Messages: शिवजयंती निमित्त HD Images, Greetings, Wallpapers, Wishes शेअर करुन द्या शिवप्रेमींना शुभेच्छा!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत त्यांचा मुलगा तसेच पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील विशेष उपस्थिती लावली. त्यांनीही शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर फुलांचा वर्षाव करुन त्यांचे दर्शन घेतले.

कोरोना व्हायरसचे सावट सध्या मुंबईवरही घोंगावत असून शिवजयंती निमित्त शिवसेनेकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना गालबोट लागू नये याची पूर्ण खबरदारी शिवसैनिकांनी घेतलेली पाहायला मिळाली.