Shiv Jayanti 2020 HD Images: महाराष्ट्रात शिवजयंती नक्की कोणत्या तारखेने साजरी करायची गेल्या अनेक दशकापासून याबाबत वाद-प्रतिवाद केले जात आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म नक्की कोणत्या तारखेस झाला? त्या दिवशी कोणती तिथी होती? जयंती तारखेने साजरी करायची की तिथीने यावरही अनेक मत-मतांतरे आहेत. त्यामुळेच प्रत्येक वर्षी शिवजयंतीच्या तारखेबाबत वेगवेगळे विचारप्रवाह दिसून येतात. नुकतीच 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती तारखेनुसार साजरी करण्यात आली होती. फाल्गुन वद्य तृतीयाच्या दिवशी छत्रपती शिवाजी महराजांचा जन्म झाला होता. त्यामुळे शिवप्रेमींकडून तिथीप्रमाणेही शिवजयंती साजरी केली जाते. यावर्षी मार्च महिन्यात फाल्गुन वद्य तृतीया तिथी आली आहे. यामुळे येत्या 12 मार्च रोजी शिवप्रेमी पुन्हा एकदा शिवजयंती साजरा करताना दिसणार आहेत. या दिवशी प्रत्येकजण एकमेकांना फेसबूक, व्हॉट्सऍपवर शिवजयंतीच्या शुभेच्छांचा वर्षाव करतात. दरम्यान, आपल्या आवडत्या व्यक्तीला एचडी इमेजच्या माध्यमातून शुभेच्छा देण्यासाठी खालील काही खास फोटो तुमच्या आनंदात भर पाडतील, अशी अपेक्षा आहे.
महाराष्ट्र सरकारकडून 2001 साली फाल्गुन वद्य तृतीया (Phalguna vadya Tritiya) शके 1551 (शुक्रवार, 19 फेब्रुवारी 1630) हा दिवस शिवाजी महाराजांचा जन्मदिवस म्हणून स्वीकारण्यात आला. महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या मते, शिव काळात इंग्रजी दिनदर्शिका नव्हते. त्यामुळे मराठी दिनदर्शिकेनुसारच शिवजयंतीचा उत्सव साजरा करावा. आपण इतर सण आपल्या मराठी महिन्यांनुसार साजरे करतो त्यामुळे शिवजयंतीचा सोहळा देखील तसाच साजरा व्हावा. या दिवशी शिवभक्त शिवनेरी किल्ल्यावर जेथे शिवरायांचा जन्म झाला, त्या ठिकाणाला भेट देऊन आदरांजली अर्पण करतात. हे देखील वाचा- Shiv Jayanti Tithi Date 2020: यंदा शिवजयंती तिथीनुसार कधी साजरी केली जाणार?
आपणांस शिवजयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा-
शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा-
आपणांस शिवजयंतीच्या मनापासून शुभेच्छा-
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा-
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा-
शिवजयंती निमित्त आपणांस व आपल्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा-
सध्या भारतात कोरोना व्हायरचा सावट पाहायला मिळत आहे. यामुळे याचा परिणाम येत्या 12 रोजी साजरी करण्यात येणाऱ्या शिवजयंतीवर होण्याची शक्यता आहे. कोरोना व्हायसरमुळे नागरिकांच्या मनात भिती निर्माण झाली असून अनेकजण घराबाहेर पडणे टाळत आहे. तसेच मोठ्या संख्येत नागरिक गर्दीच्या ठिकाणी जात नाहीत. नुकतेच कर्नाटकमधील एका व्यक्तीचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाल्याचे अनेक वृत्तवाहिनींनी त्यांच्या अहवालात सांगितले आहे.